पुणे Mother Son Suicide : एका 32 वर्षीय महिलेनं तिच्या चार वर्षाच्या चिमूरड्यासह इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी मारली. यात दोघाही मायलेकांचा मृत्यू झालाय. वाकड येथील यमुनानगर परिसरातील एका सोसायटीत शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.
अमेरिकेत सुरु होते उपचार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत 32 वर्षीय महिलेचा वाकड येथील एका तरुणाशी 2018 मध्ये विवाह झाला. त्यानंतर तिचा पती नोकरीनिमित्त अमेरिकेत गेला. त्यावेळी ही महिलाही तिच्या पतीसोबत अमेरिकेत गेली. दरम्यान तिला मानसिक आजाराचा त्रास सुरु झाला. त्यानंतर अमेरिकेतच तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र, तिला मानसिक त्रास सुरुच राहिल्यानं ती भारतात परतली. त्यानंतर तिच्यावर पुण्यात उपचार करण्यात येणार होते.
अकराव्या मजल्यावरुन मारली उडी : दरम्यान, मानसिक त्रास जाणवत असल्यानं तिला जास्त भीती वाटू लागली, त्यातच शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास अकराव्या मजल्यावरुन तिनं आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्यासोबत उडी मारली. यात खाली पडून दोघंही जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात होते. ही माहिती शेजारच्यांनी सुरक्षारक्षकांना माहिती दिली, सुरक्षारक्षकांनी महिलेच्या घरच्यांना तसंच पोलिसांनाही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या दोघांना सांगवी येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
मानसिक आजारनं होती त्रस्त : मृत महिला पतीसह अमेरिकेत राहत होती. काही दिवसांपूर्वीच ती पिंपरी- चिंचवड शहरातील एका सोसायटीत राहायला आली. ती मानसिक आजारानं त्रस्त असल्यानं अमेरिका आणि भारतात तिच्यावर उपचार सुरु होते. लग्नानंतर दोघंही पती पत्नी अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यानंतर तिला मानसिक आजार सुरु झाला. या मानसिक आजारानं ती जास्तच त्रस्त झाली. यातूनच तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
हेही वाचा :
- सर्वांत चर्चेत असलेल्या 'या' लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्याची आत्महत्या, 'हे' कारण आले समोर - Farmer Suicide Video Viral
- सर्व नेते गुंतले लोकसभेच्या मैदानात! शेतकऱ्यांच्या वाट्याला मात्र आत्महत्या; वाचा 'ईटीव्ही'चा खास रिपोर्ट - Farmers Suicide in Maharashtra
- एमडीएमके खासदाराचा मृत्यू, लोकसभेचं तिकीट नाकारल्यानं केली आत्महत्या? - lok sabha election 2024