पुणे Pune Gold Rate :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यात विविध क्षेत्रासाठी सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने-चांदीवरील (Gold And Silver Rate) आयात कर 6.5 टक्क्यावरून 6 टक्के केल्यानं सोने-चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किंमतीत 3 हजार तर चांदीच्या किंमतीत 5 हजारने घसरण झाली आहे.
ग्राहकांना फायदा :याबाबत सराफ व्यावसायिक फत्तेचंद रांका म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कस्टम ड्युटी ही कमी केली आहे. जी कस्टम ड्युटी 15 टक्के होती ती 6 टक्के झाली आहे. 9 टक्क्यांनी कस्टम ड्युटी ही कमी केली आहे. यामुळं सोने आणि चांदीच्या किंमतीत खूप फरक पडला आहे. सोन्यात 3 हजार तर चांदीमध्ये 5 हजार रुपये कमी झाले आहेत. आज सोने-चांदीबाबत जो काही निर्णय घेण्यात आला आहे तो खूपच चांगला आहे. याचा ग्राहकांना फायदा होणार आहे.
पुढील काळात सोन्याचे भाव वाढणार :ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा. कारण सोन्याचं उत्पादन हे भारतात होत नाही, तर परदेशात होत असतं. विविध देश हे सोन्याची साठवणूक करत आहेत. तर दुसरीकडं युद्धाचं वातावरण आहे. तसंच जागतिक परिस्थिती पाहता पुढील काळात सोन्याचे भाव वाढू शकतात. यामुळं आज जी सुवर्णसंधी आली आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन, रांका यांनी केलय. तसंच आजच्या या निर्णयानं ग्राहकांची संख्या देखील वाढणार आहे.