महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईव्हीएमविरोधात महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाकडून मोर्चा, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी - NASHIK EVM PROTEST

नाशिकमध्ये ईव्हीएम विरोधात आज (13 डिसेंबर) मोर्चा काढण्यात आला. महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाकडून हा मोर्चा काढण्यात आला.

NASHIK EVM PROTEST
नाशिकमध्ये ईव्हीएमविरोधात मोर्चा (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2024, 9:18 PM IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला जनाधार पाहता विरोधकांनी ईव्हीएम मशीनमध्ये दोष असल्याचा आरोप केलाय. दरम्यान, नाशिक शहरात आज (13 डिसेंबर) ईव्हीएम विरोधात मोर्चा काढण्यात आला. महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाकडून हा मोर्चा काढण्यात आला. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. जनतेच्या मनात ईव्हीएमबाबत असलेली शंका लक्षात घेता, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं. या मोर्चात महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाच्या अनुयायांसह महाविकास आघाडीतील स्थानिक नेते, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते तसंच विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार सहभागी झाले होते.

नाशिकमध्ये ईव्हीएमविरोधात मोर्चा (Source - ETV Bharat Reporter)

पुन्हा मतदान घ्यावं : "ईव्हीएम विरोधात आता धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन याबाबत आवाज उठवत आहेत. ईव्हीएम विरोधात आम्ही या मोर्चात सहभागी झालो आहोत. आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं, पण माणसांना कळतं. बूथ क्रमांक 5,15 आणि 25 अनुक्रमांक हे तीन बूथचे व्हीव्हीपॅट मोजावे, अन्यथा मारकडवाडीप्रमाणे आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा," असं निफाड मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे पराभूत उमेदवार अनिल कदम यांनी म्हटलं.

ईव्हीएम मशीन वापरू नये : "जे गॅरेंटेड उमेदवार निवडून येणार होते, ते पराभूत झाले आहेत. ही एकतर्फी निवडणूक झाली आहे. ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी झाली आहे आणि हे सर्व लोकांना कळलं आहे, त्यामुळं पुढील सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन वापरू नये, अशी आमची मागणी आहे," असं कळवण मतदारसंघातील माकपचे पराभूत उमेदवार जे.पी. गावित यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा

  1. मुश्रीफ, कोरे, शिवेंद्रराजे यांच्या मंत्रिपदानं पश्चिम महाराष्ट्रातील सहकाराला मिळणार 'बूस्ट'
  2. "संविधान सुरक्षा कवच, सत्ताधाऱ्यांनी ते तोडण्याचा प्रयत्न केला": प्रियंका गांधींचा संसदेतील पहिल्याच भाषणात घणाघात
  3. "दिल्लीत बैठकांचा जोर वाढला, कुछ तो गडबड है" विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

ABOUT THE AUTHOR

...view details