साताराChhatrapati Shivaji Maharaj Waghnakh :छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं लंडनच्या व्हिक्टोरिया ॲंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून साताऱ्यात आणण्यात आली आहेत. आज (शुक्रवारी) दुपारी एक वाजता वाघनखांचं दर्शन, वाघनखं ठेवण्यात आलेल्या दालनाचं उद्घाटन आणि 'शिवशस्त्रशौर्यगाथा' या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी अनेक मंत्री आज सातारा दौऱ्यावर आहेत.
शिवकालीन शस्त्रांचं भव्य प्रदर्शन : छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक आणि बहुप्रतिक्षीत वाघनखं मोठ्या कडक बंदोबस्तात अत्यंत गुप्तता पाळत बुधवारी सायंकाळी मुंबईहून साताऱ्यात आणण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखं ठेवण्यात आली आहेत. वाघनखांचं दर्शन आणि शस्त्रांच्या प्रदर्शनाचं आज उद्घाटन होत आहे. शनिवारपासून (20 जुलै) वाघनखं शिवप्रेमींना पाहता येतील. या ऐतिहासिक घटनेचं स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज आहे.
लंडनहून आणलेली वाघनखं खरी की खोटी? :लंडनहून आणण्यात आलेली वाघनखं ही खोटी असल्याचा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला होता. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वाघनखं खरी की खोटी, असा सवाल केला आहे. वाघनखं खरी नसतील तर तरूण पिढीवर नंतर काय परिणाम होईल, असंही सुळेंनी म्हटलं आहे. वाघनखांची वस्तुस्थिती सरकारनं समोर आणण्याची त्यांनी मागणीही केलीय.
संग्रहालयावर आकर्षक विद्युत रोषणाई :वाघनखं ठेवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या वास्तूवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संग्रहालय परिसरात कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साताऱ्यात दाखल झाल्यानंतर शिवतीर्थ ते छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर वाघनखं दर्शनाचा भव्य सोहळा पार पडणार आहे.
हेही वाचा
- प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य भोवले! आव्हाड यांच्या विरोधातील गुन्हे शिर्डीत वर्ग करण्याचे न्यायालयाचे निर्देश - Jitendra Awhad News
- मोहरमच्या मिरवणुकीतून रुग्णवाहिकेला दिली वाट, पोलिसांचा संशय येताच 'त्या' प्रकरणात चालकावर गुन्हा दाखल - MUMBAI CRIME NEWS
- कोल्हापुरात सामाजिक समतेचं दर्शन, विशाळगड हिंसाचारानंतर काढण्यात आली शिव-शाहू सदभावना रॅली - Vishalgad Violence