महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आली रे आली 'लालपरी' आली! तब्बल 76 वर्षांनी कोल्हापुरातील मानेवाडीत आली एसटी बस, गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात केलं स्वागत - लालपरी

ST Bus In Manewadi : मानेवाडी गावची लालपरीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. प्रयत्नाचे सातत्य आणि पाठपुरावा यामुळं राधानगरी आगार चालू झाल्यापासून आज पहिली एसटी बस मानेवाडीत आली. राधानगरी आगारातून धामोड-म्हासुर्ली मार्गावर धावणारी बस आता मानेवाडी गावात जाणार आहे.

ST Bus In Manewadi
कोल्हापूरातील मानेवाडी गावात अवतरली 'लालपरी'

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 6:24 PM IST

कोल्हापुरातील मानेवाडी गावात 76 वर्षांनी एसटी बस आली

कोल्हापूर ST Bus In Manewadi : एकीकडं देशाचा अमृत महोत्सव साजरा होतोय, तर दुसरीकडं देशातील अनेक गावांमध्ये एसटीची सुविधाही पोहोचलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीतील मानेवाडी हे त्यापैकीच एक गाव आहे. डोंगरदऱ्यांनी नटलेल्या राधानगरी या दुर्गम भागातून पायपीट करत या गावकऱ्यांचा आतापर्यंतचा प्रवास सुरू होता. सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या या गावात तब्बल 76 वर्षांनी 'लालपरी' अवतरली आणि गावकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. पहिल्यांदाच एसटी गावात आल्यावर गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात एसटीचं स्वागत केलं.

एसटी बससेवा सुरू : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या राधानगरी तालुक्याची ओळख कोल्हापूरचं पर्यटन हब अशी आहे. विखुरलेल्या वाड्या-वस्त्या, धनगरवाडा, यामुळं दुर्मीळ लोकवस्ती या परिसरात आढळते. या भागातील नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा असेल, तर सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातून पायपीट करतच प्रवास करावा लागायचा. मात्र, आता 76 वर्षांनी अत्यंत दुर्गम भागात वसलेल्या मानेवाडी या गावात एसटी बस सुरू झाली आहे.

राधानगरी आगारातून धामोड-म्हासुर्ली मार्गावर धावणारी बस आता मानेवाडी गावात जाणार आहे, यामुळे कोल्हापूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात पहिल्यांदाच लालपरी अवतरल्याने गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सोमवारी सकाळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस इतक्या वर्षांनी गावात आली. यामुळं गावकरी आनंदून गेले, ढोल ताशांच्या गजरात गावात एसटी घेऊन आलेल्या चालक आणि वाहकांचा खास कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. गावातील महिलांनी एकत्र येत लाल परीचं औक्षणही केलं.

गावातील तरुणांचा पुढाकार : मानेवाडी या अवघ्या हजार एक लोकवस्तीच्या गावात जेमतेम हातावर मोजाव्यात इतक्याच मुली उच्च शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षणासाठी मुलंही राधानगरी या ठिकाणी जातात. मात्र, प्रवासासाठी एसटी बस उपलब्ध नसल्यानं त्यांना डोंगरातून पायपीट करतच शिक्षण घ्यावं लागत होतं. या गोष्टींचा विचार करून गावातील तरुणांनी एकत्र येत गेल्या सहा महिन्यांपासून राधानगरी आगाराकडं गावात एसटी बस सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा केल्याचं गावातील तरुण प्रकाश माने यानं सांगितलं. त्याला आता फळ आलं आहे.


हेही वाचा -

  1. MSRTC fare hike : दिवाळीच्या तोंडावर एसटीची भाडेवाढ, ग्राहकांच्या खिशाला चाट लावून लालपरी मिळवणार 'बोनस'
  2. Holi Festival : होळीच्या निमित्ताने अधिक संख्येने धावणार लालपरी; कोकणात एसटीच्या जादा २५० बसेस
  3. ST Corporation : दर महिन्याला हप्ते वसूली होत असल्याने एसटी आर्थिक संकटात; कर्मचारी संघटनेचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details