महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गायी गोंदणनिमित्त मतदान जनजागृती मोहीम, बलिप्रतिपदानिमित्त स्वीप अंतर्गत विशेष मोहीम

अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

VOTER AWARENESS CAMPAIGN
मतदान जनजागृती मोहीम (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2024, 11:05 PM IST

अमरावती :मतदान करा, मतदान हा आपला अधिकार, 20 नोव्हेंबरला प्रत्येकानं मतदान केंद्रावर जावं. अशा स्वरूपात मतदान जनजागृती करणारे संदेश बलिप्रतिपदानिमित्त गाई आणि म्हशी सजवताना त्यावर लिहून ग्रामस्थांमध्ये अनोख्या पद्धतीनं मतदान जनजागृती मोहीम अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात विविध गावांमध्ये राबविण्यात आली. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम विविध गावातील पशुपालकांनी मोठ्या आनंदात राबवला.

दीपोत्सवात मतदारांना आवाहन :विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येत जागृतपणे मतदान करावं, यानिमित्तानं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहोपात्रा यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात स्वीप कक्षाची निर्मिती करण्यात आली. या स्वीप कक्षांतर्गत गावातील शाळांमध्ये दीपावली उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये रांगोळी रेखाटन, पणती सजावट, फलक सजावट, आकाश कंदील निर्मिती, मी मतदान करणार, आपले हक्क आपले मत, मतदान करा देश घडवा, मतदान करा देश बळकट करा, लोकशाही करा पक्की मतदान करा नक्की यासारखे असंख्य संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला.

मतदान जनजागृती मोहीम (Source - ETV Bharat Reporter)

गायी आणि म्हशींवर विविध रंगरंगोटीसह मतदार जनजागृती संदेश : शनिवारी बलिप्रतिपदानिमित्त प्रत्येक गावात पशुधनाची पूजा करून गायी आणि म्हशी रंगविल्या जातात आणि त्यांची मिरवणूक काढण्यात येते. दिवाळीच्या पर्वावर गायी गोंदण करताना त्यावर मतदान जनजागृतीपर संदेश लिहावे. या प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत धामणगाव रेल्वे मतदार संघात येणाऱ्या चांदुर रेल्वे तालुक्यातील लालखेड, मालखेड, मांजरखेड यासह विविध गावांमध्ये गायी आणि म्हशींवर विविध रंगरंगोटीसह मतदार जनजागृती संदेश देखील गोंदवण्यात आलेत.

मतदानाचा टक्का वाढेल ही आशा :प्रशासनाच्या वतीनं मतदान जनजागृती संदर्भात गायी गोंधणद्वारे मतदार जनजागृती करण्यासंदर्भात करण्यात आलेल्याल्या आवाहनाला अनेक गावांमध्ये मिळणारा प्रतिसाद हा निश्चितच या निवडणुकीत मतदारांची किमान टक्केवारी वाढेल, असा आशावाद निर्माण करणारा असल्याची प्रतिक्रिया चांदुर रेल्वे तालुक्यातील स्विफ्टचे नोडल अधिकारी संदीप बोडखे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

हेही वाचा

  1. "जयंत पाटील मस्करी करतात, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका"; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
  2. अनंतराव देशमुखांच्या उमेदवारीमुळे रिसोड शिवसेनेत अस्वस्थता, इतर मतदार संघात पडसाद उमटण्याचे संकेत
  3. बारामतीत दोन पाडवा; दोन्ही पवारांकडे गर्दीच गर्दी, विधानसभेआधी दोन्ही पवारांनी दाखवून दिली ताकद

ABOUT THE AUTHOR

...view details