महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदकुमार गोरुले या आनंद दिघे यांच्या सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, नागरिकांमध्ये व्हिडिओ ठरला चर्चेचा विषय - Nandkumar Gorule Video - NANDKUMAR GORULE VIDEO

Nandkumar Gorule Video : ठाणे जिल्ह्यातील लोकसभेचे मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. अशातच आनंद दिघे यांचा सहकारी नंदकुमार गोरुले यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिबाबत स्थानिक नागरिक आणि राजकीय नेत्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Nandkumar Gorule Video
नंदकुमार गोरुले (REporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 11:07 PM IST

Updated : May 20, 2024, 6:25 AM IST

ठाणेNandkumar Gorule Video :ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नंदकुमार गोरुले या कार्यकर्त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू मानले जाणाऱ्या आनंद दिघे यांच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. त्यासोबत त्याकाळात त्यांच्या असलेल्या नेत्यांच्याबाबतही भाष्य केलं आहे. ठाण्यात आनंद दिघे यांचे नाव आजही सन्मानाने घेतले जाते. निवडणुका आणि आनंद दिघे हे एक समीकरण आहे. या निवडणुकांच्या काळातच नंदकुमार यांचा व्हिडिओ आल्याने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यामुळे व्हिडीओला नागरिकांची पसंती :लोकसभा निवडणुकांचे मतदान अवघ्या काही तासांवर आले आहे. अशा वेळी नंदकुमार गोरुले यांनी व्हिडिओमधून अनेक आठवणी सांगितल्या आहेत. यात आनंद दिघे यांना आलेला पहिला ह्रदयविकारा झटका तसेच ठाण्यातील अनेक नेत्यांच्या आठवणी आहेत. गोरुले हे आनंद दिघे यांचा पत्रव्यवहार सांभाळत होते. त्यामुळे अनेक खासगी गोष्टी त्यांना माहीत आहेत. त्यांनी आनंद दिघे या सिनेमाबाबतदेखील टीका केली आहे. हा सिनेमा अतिरंजित केला असल्याच्या दावा नंदकुमार गोरुले यांनी केला. या व्हायरल व्हिडिओमध्ये शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नात्याबाबतही उल्लेख करण्यात आला आहे. नंदकुमार गोरुले हे आनंद आश्रमात काम करत असताना त्यांनी पाहिलेल्या अनेक गोष्टी त्याकाळचे वातावरण आणि लोकांनी आनंद दिघे यांना दिलेले प्रेम यांचा परिपूर्ण उल्लेख या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे या व्हिडिओला नागरिकांची पसंतीदेखील मिळत आहेत.

राजकारण्यांचीही मिळत आहे पसंती:निवडणुकांच्या काळात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे यांच्यात सातत्यानं आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यामुळे काहीसे कलुषित झालेले वातावरण झाले. अशा स्थितीत गोरुले यांच्या या व्हिडिओमुळे खरी माहिती मिळाल्याचा काही जाणकार दावा करतात. म्हणूनच या व्हिडिओला आनंद दिघे यांना ओळखणारे ठाणेकर आणि राजकारणीदेखील पसंती देत आहेत.

हेही वाचा :

  1. "अजित पवारांमध्ये कोणते गुण कमी होते?"; शरद पवारांच्या 'त्या' दाव्यानंतर अमोल मिटकरींचा सवाल - Lok Sabha Election
  2. "… तर तेव्हाच मी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो”...; छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट - Lok Sabha Election 2024
  3. मुख्यमंत्री पदी शिंदे यांच्या नावाला संजय राऊत यांचाच विरोध, उमेश पाटील यांचा खुलासा - Umesh Patil About CM Post
Last Updated : May 20, 2024, 6:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details