पुणे UPSC Issue Notice To Pooja Khedkar :वादग्रस्त परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC) मोठा दणका दिला आहे. लोकसेवा आयोगानं पूजा खेडकर यांच्याविरोदात खटला दाखल केला आहे. आयोगानं पूजा खेडकर यांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. लोकसेवा आयोगानं वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना नोटीस बजावल्यानं त्यांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत.
उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणं दाखवा नोटीस :केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा-2022 च्या तात्पुरत्या शिफारस केलेल्या उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाचा तपशीलवार आणि सखोल तपास केला आहे. या तपासणीतून असं उघड झालं आहे की त्यांनी परीक्षा नियमांनुसार परवानगी असलेल्या मर्यादेच्या पलीकडं त्यांचं नाव, वडिलांचं आणि आईचं नाव, फोटो आणि स्वाक्षरी, त्यांचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून त्यांची खोटी ओळख देऊन फसवणूक केली. त्यामुळे, UPSC नं, पोलीस अधिकाऱ्यांकडं फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट (FIR) दाखल करून फौजदारी खटल्यासह त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली. त्यांची सिव्हिलची उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणं दाखवा नोटीस (SCN) जारी केली आहे. सेवा परीक्षा-2022 नागरी सेवा परीक्षा-2022 च्या नियमांनुसार भविष्यातील परीक्षा निवड यापासून बंदी घालण्याचं प्रस्तावित करण्यात येत आहे.