ठाणेUnnatural abuse child in Madrasa : मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका 11 वर्षीय अल्पवीयन मुलावर 20 वर्षीय नराधमानं बळजबरीनं अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील एका मदरशात घडली असून आरोपीविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मदरशात अनैसर्गिक अत्याचार :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील पिराणी पाडा परिसरातील एका मदरशात पीडित अल्पवयीन मुलगा तसंच आरोपी शिक्षण घेत आहेत. 24 तसंच 25 जून रोजी आरोपीनं अल्पवयीन मुलगा मदरशात झोपलेला असताना त्याच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलाला त्रास असहाय्य झाल्यानं त्यानं त्याच्यासोबत घडलेला प्रसंग आईला सांगितला. ही घटना ऐकून आईला धक्काच बसला.