मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज (9 ऑक्टोबर) सकाळी एअर इंडियाच्या विमानानं सकाळी 9 वाजता दिल्लीला रवाना होण्यासाठी निघाले. दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते विमानाने रवाना झाले. मात्र, विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं पुन्हा मुंबई विमानतळावर विमानाचं लँडिंग करण्यात आलं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमान दुरुस्ती करण्यासाठी ते विमान मुंबई विमानतळावर 4 तासांपासून विमानतळावरच थांबवण्यात आल्यानं रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केलीय.
रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी : विमान सकाळी 9 वाजल्या पासुन दुपारी 1 वाजेपर्यंत विमानतळावरच थांबवण्यात आलं. त्यामूळे सकाळी 8 वाजता विमानतळावर आलेले रामदास आठवलेंना दुपारी 1 वाजेपर्यंत विमानतळावर अडकून राहावं लागलं. विमानात बिघाड झाल्यानंतर एअर इंडियानं प्रवाशांना अन्य विमानानं त्यांच्या गांत्व्यास्थळाकडे रवाना करणं आवश्यक होतं. मात्र, 6 तासांपेक्षा जास्त वेळ प्रवाशांना ताटकळत राहावं लागलं.