महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Union Minister Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हॅट्रिकसाठी सज्ज, भाजपाच्या दुसऱ्या यादीत 'यांना' संधी - Union Minister Nitin Gadkari

Union Minister Nitin Gadkari : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे तर विदर्भातील चार उमेदवारांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. सर्वांना प्रतीक्षा असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात यावेळीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Union Minister Nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 8:55 PM IST

नागपूरUnion Minister Nitin Gadkari:नितीन गडकरी हे यावेळी सलग तिसऱ्यांदा नागपूर लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. तर वर्धा लोकसभा मतदारसंघातून वर्तमान खासदार रामदास तडस यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ते देखील तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सर्वांत धक्कादायक म्हणणे, चंद्रपूर येथून भाजपाने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांनी कितीही नाही म्हटलं तरी पक्षश्रेष्ठींनी मुनगंटीवारांना लोकसभेत पाठवण्याची तयारी केली आहे. अकोला येथून भाजपाने अनुप धोत्रे यांना संधी दिली आहे.


दहा वर्षांपासून भाजपाची सत्ता :नागपूर शहराचं नेतृत्व अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी केलंय. गेल्या दहा वर्षांपासून नागपूर लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे.

गडकरींच्या विरोधात कोण लढणार :नितीन गडकरी यांना भाजपाकडून उमेदवारी दिली आहे. गडकरींना तगडे आव्हान देऊ शकेल असा उमेदवार काँग्रेस पक्षाला अद्यापही गवसलेला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विलास मुत्तेमवार यांच्याबाबत काँग्रेस पुन्हा डावपेच खेळू शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही.

काँग्रेसच्या गटाला एकत्र करण्याचं आव्हान :नागपूर हा भाजपाचा बालेकिल्ला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नागपूरचे आहेत. दुसरीकडे काँग्रेसमधील गटबाजीमुळं आज काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. मुत्तेमवार गट, नितीन राऊत गट, राजेंद्र मुळक गटही सक्रिय असल्यामुळं नागपुरात काँग्रेस विखुरली आहे. त्यामुळं नाना पटोलेंसमोर सर्व गटांना एकत्र करण्याचं आव्हान आहे.


याहीवेळी भाजपा-काँग्रेस आमनेसामने :गेल्या निवडणुकीत भाजपा तसंच काँग्रेस पक्षात थेट लढत झाली होती. भाजपाकडून नितीन गडकरी तसंच काँग्रेसकडून नाना पटोले निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी नितीन गडकरी यांना 6 लाख 60 हजार 221 तर नाना पटोले यांना 4 लाख 44 हजार 212 मते मिळाली होती. तसंच सागर डबरासे यांना 26 हजार 128, मोहम्मद जमाल यांना 31 हजार 757, डॉ. सुरेश माने यांना 3 हजार 421 मतांवर समाधान मानावं लागलं होतं.

हेही वाचा :

  1. Pravin Darekar : महायुतीत विसंवाद होईल, असं वक्तव्य करू नका...; प्रवीण दरेकरांचा बच्चू कडूंना सल्ला
  2. Electoral Bond Case: इलेक्टोरल बाँड्सचं सीलबंद लिफाफ्यात दडलयं रहस्य, एसबीआयनं सर्वोच्च न्यायालयात काय दिली माहिती?
  3. Lok Sabha Election 2024 :पंतप्रधानांच्या नावावरच निवडणुका लढवायच्या, तर शिंदे, पवारांना जास्त जागा का द्यायच्या ; 'संघा'चा भाजपा पक्षश्रेष्ठींना सवाल ?

ABOUT THE AUTHOR

...view details