महाराष्ट्र

maharashtra

सभापतींचा निर्णय लोकशाही विरोधी : दावनेंच्या निलंबनावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाना - Uddhav Thackeray targeted Mahayuti

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 4:28 PM IST

Uddhav Thackeray Targeted Mahayuti : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनावरून उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. सभापतींनी घेतलेला निर्णय लोकशाही विरोधी असल्याची टीका त्यांनी केली आहे. ते विधानभवनाबाहेर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं देत होते.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद (Etv Bharat Reporter)

मुंबईUddhav Thackeray Targeted Mahayuti :विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. विधान परिषदेच्या सभापतींनी घेतलेल्या या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अत्यंत तिखट शब्दात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

निलंबन पूर्वनियोजित कारस्थान : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांना एका कटाचा भाग म्हणून निलंबित करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. “अंबादास दानवे यांना त्यांची भूमिका मांडण्याची संधी द्यायला हवी होती. त्यांना वेळ द्यायला हवा होता, पण त्यांना वेळ दिला गेला नाही. आम्हाला बोलू दिलं नाही. एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्याचं निलंबन हे पूर्वनियोजित कारस्थान असल्याची महाराष्ट्राच्या इतिहासात कदाचित पहिलीच वेळ असावी. हा सगळा अन्याय महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“तुमचा आवाज मांडताना विरोधी पक्षाला निलंबित केलं जात आहे. हे राज्यातील सर्व जनतेनं पाहावं. विरोधीपक्षनेत्यांचं निलंबन होत असेल तर, सर्वसामान्य जनतेचं काय? वातावरण खूप वाईट आहे. या निमित्तानं मी परत एकदा सांगतो, येणारी विधान परिषदेची निवडणूक आम्ही एकत्र एका ताकदीनं लढवू”, - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उबाठा)

लोकशाहीविरोधी निर्णय : “विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलं आहे. एकदा प्रस्ताव आला की त्यावर चर्चा होणं आवश्यक आहे. दुसरी बाजू मांडू देणं, लोकशाहीसाठी आवश्यक आहे. त्याचा निर्णय अपेक्षित आहे. निलंबित करण्याचा अधिकार अध्यक्ष किंवा सभापती यांच्याकडं आहे. मात्र त्यासाठी एकतर्फी निर्णय घेण्यात आला, कोणीतरी मागणी केली, त्यामुळं हा निर्णय लोकशाहीविरोधी आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

देवेंद्र फडणवीसही आक्रमक : अंबादास दानवे यांच्या विधानानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ करणाऱ्या निलंबनाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सभापतींना आपली बाजू सभागृहात मांडण्याची विनंती केली. मात्र, उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी निलंबनाच्या मुद्द्यावर आपलं मत मांडता येणार नाही, असा आक्रमक पवित्रा सभागृहात घेतल्यानं सभापतींनी विरोधकांना बोलू देण्याची संधी नाकारली. निलंबनाच्या मुद्द्यावर विरोधकांना बोलू दिलं, तर चुकीचं पाऊल ठरेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'हे' वाचलंत का :

  1. विधिमंडळ समित्या का रखडल्या ; राजकीय पक्ष आहेत का जबाबदार ?, जाणून घ्या सविस्तर - Maharashtra Legislative Committees
  2. लोकसभा अधिवेशन 2024: राहुल गांधींचं हिंदुत्वावर वादग्रस्त वक्तव्य; आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पलटवार - Lok Sabha Session 2024
  3. विधिमंडळ समित्या का रखडल्या ; राजकीय पक्ष आहेत का जबाबदार ?, जाणून घ्या सविस्तर - Maharashtra Legislative Committees

ABOUT THE AUTHOR

...view details