महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"मोदी जो निर्णय घेतील..."; मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट - Uddhav Thackeray Stance

Uddhav Thackeray Stance on Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. राजकीय पक्ष आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडत नसल्यानं मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 3:23 PM IST

Updated : Jul 30, 2024, 3:44 PM IST

मुंबई Uddhav Thackeray Stance on Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून मराठा क्रांती ठोक मोर्चानं मंगळवारी आक्रमक भूमिका घेत शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यानंतर मराठा आरक्षणाचे नेते रमेश केरे-पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत निवेदन दिले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, मराठा आरक्षणावरून आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? हे स्पष्ट केले.

ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट : मराठा आरक्षणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "सध्या राज्यात जाती-पातीत आणि समाजामध्ये भांडण लावून काहीजण आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायेत. मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना न बोलावता सर्व समाजातील लोकांना एकत्र बोलावून तोडगा काढला पाहिजे. मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नाही. हा अधिकार केंद्राचा आहे. याची मर्यादा केंद्र सरकारने वाढवली पाहिजे. मी माझे खासदार द्यायला तयार आहे. सर्वांनी मिळून केंद्राकडे जाऊया... मोदींकडे जाऊया... जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे. त्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे."

घाणेरड्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न :अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. "अनिल देशमुख त्यावेळेला उघडपणे बोलले होते. मलाही त्यांनी सांगितलं होतं. हे सगळी लोकं (महायुती) अमानुष आहेत. अतिशय घृणास्पद काम त्यांच्याकडून होत आहे. घाणेरड्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला गेला. यांना मुलंबाळं नाहीत अशी ते वागत आहेत. पूर्वीचा भाजपा आणि आताचा भाजपा वेगळा आहे. देश पातळीवर ही वृत्ती संपवण्याची गरज आहे," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला.

अमित शाहांनी राजीनामा द्यावा :अजित पवारांनी आपण वेषांतर करून कसे दिल्लीला गेलो हे सांगितलं. यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली आहे. "अजित पवार वेषांतर करून दिल्लीला गेले यावरून मुंबई, दिल्ली विमानतळाची सुरक्षा किती बोगस आहे, हे समजतं. देशाच्या गृहमंत्र्यांच्या सहमतीनं हे सर्व होतंय. जो स्वतःच्या पक्षाच्या स्वार्थासाठी सर्व अधिकार वापरतोय हे किती घातक आहे हे आपण समजू शकतो. असा गृहमंत्री पदावर राहता कामा नये. त्यांनी (अमित शाह) राजीनामा दिला पाहिजे," अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

मुंबईची 'अदानी सिटी' होऊ देणार नाही : "धारावी प्रकल्पाबाबत मी वर्तमानपत्रात बातमी वाचली. मी मागील आठवड्यातही धारावी प्रकल्पाबाबत बोललो होतो की, हा जर प्रकल्प व्हायचा असेल तर धारावीकरांना त्यांच्या हक्काचे घर धारावीमध्येच मिळाले पाहिजे. मुलुंड किंवा मुंबईच्या बाहेर धारावीकरांना घरं नको. अदानींसाठी या प्रकल्पाचा घाट घातला तो आम्ही होऊ देणार नाही. आम्ही मुंबईची 'अदानी सिटी' होऊ देणार नाही," असं म्हणत परत एकदा उद्धव ठाकरेंनी धारावी प्रकल्पावरुन शिंदे सरकारवर निशाणा साधला.

मुंबईची लूट सुरू : "सध्या सर्व योजना 'लाडकी बहीण, लाडका भाऊ' नावाने सुरु आहेत. तसा 'लाडका कॉन्ट्रॅक्टर' ही योजना पण सरकारने आणली पाहिजे. मुंबईतील अनेक जागा, भूखंड हे सरकार कॉन्ट्रॅक्टर आणि काही खास लोकांच्या घशात घालत आहे. पशुसंवर्धन खात्याचा भूखंड मुंबई बँकेला देण्याचा सरकारने घाट घातला. आता जो जीआर वेबसाईटवर डाऊनलोड केला होता, तो आता तिथून डिलीट केला आहे. जे सरकारचे कोणी खास आहेत त्यांच्यासाठी भूखंड देण्याचा सरकारने ठरवले आहे. परंतु, आम्ही असे होऊ देणार नाही. आमचं सरकार आल्यानंतर हा निर्णय नक्की रद्द करून, ज्या कामासाठी हा भूखंड ठेवले आहेत त्याच कामासाठी भूखंड वापरले जातील," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली.

हेही वाचा -

  1. आरक्षणावरुन शरद पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न हास्यास्पद, राष्ट्रवादीचा पलटवार, तर विरोधकांचा हल्लाबोल - Maratha Reservation Quota
  2. जरांगे राजकीय भूमिका मांडाल तर खबरदार; आशिष शेलार यांचा थेट इशारा - Ashish Shelar On Jarange Patil
  3. दरेकर जरांगेंचा कलगी तुरा; जरांगे म्हणतात, 'कपाळावर कुंकू लावले तर ते...', तर दरेकर म्हणतात 'जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही' - Manoj Jarange Patil
Last Updated : Jul 30, 2024, 3:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details