महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिला अत्याचाराच्या निषेधार्थ उद्धव ठाकरेंकडून मुंबईत आंदोलन; नागपुरात राज ठाकरेंनी काढली आंदोलनाची हवा - Uddhav Thackeray Protest In Mumbai - UDDHAV THACKERAY PROTEST IN MUMBAI

Uddhav Thackeray Protest In Mumbai : महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे. उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुंबईत भरपावसात आंदोलन केलं. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनावर टीका केली.

Uddhav Thackeray Protest In Mumbai
आंदोलनात सहभागी झालेले उद्धव ठाकरे (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 1:40 PM IST

मुंबई Uddhav Thackeray Protest In Mumbai :राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभर महाविकास आघाडीकडून काळ्या फीती बांधून निदर्शन करण्यात येत आहेत. शरद पवार यांच्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर पुण्यात निदर्शनं करण्यात येत आहे. तर ठाण्यात नाना पटोले यांच्याकडून निदर्शनं करण्यात येत आहे. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना भवन समोर तोंडाला काळ्या फिती बांधून निदर्शनं करण्यात येत आहे. यावेळी शिवसेना भवन समोर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. मात्र महाविकास आघाडीतील नेते महिला अत्याचाराच्या घटनेविरोधात आंदोलन करत असताना नागपुरात राज ठाकरे यांनी या आंदोलनातील हवाच काढून घेतली आहे. राज ठाकरे यानी महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या महिला अत्याचाराच्या घटनांची जंत्रीचं वाचून दाखवली आहे.

शिवसेना भवनसमोर उद्धव ठाकरे यांचं आंदोलन :शिवसेना भवन समोर एक व्यासपीठ बांधण्यात आलं आहे. यावर काळ्या रंगाचे पडदे आणि काळा रंगाचं बॅनर लावण्यात आलं. अनेक शिवसैनिकांनी काळा रंगाचे कपडे परिधान केलेत. तसेच हातात काळा झेंडा घेऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला असून, तोंडाला आणि हाताला काळी फित बांधून शिवसैनिकांच्या गरड्यात व्यासपीठाच्या मध्यभागी उभे आहेत. यावेळी शिवसैनिकांकडून संतप्त घोषणाबाजी होत आहे. बदलापुरातील चिमूरड्यांना न्याय द्या.., न्याय द्या... चिमूरड्यांना न्याय द्या.., अन्यथा खुर्ची खाली करा, फाशी द्या.. फाशी द्या.. आरोपीला फाशी द्या, अशी घोषणाबाजी करत शिवसैनिक यांनी परिसर दणाणून सोडला.

जनतेसाठी रस्त्यावर उतरू :महाविकास आघाडीकडून आज बंद पुकारण्यात आला होता. मात्र शनिवारचा बंद हा बेकायदेशीर असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला. यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाचा आदर करत बंद मागे घेतला. परंतु राज्यातील चौकात चौकात काळ्याफिती बांधून आम्ही निदर्शनं करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. तसेच महिला, भगिनीवर जे अत्याचार होत आहेत. त्यांना न्याय मिळत नाही, त्यांची सुरक्षा करण्यास हे सरकार असमर्थ ठरले आहे. म्हणून या जनतेचा आवाज उठवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहे. भविष्यात सुद्धा जनतेसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. आज शिवसेना भवन समोर त्यांनी तोंडाला आणि हाताला काळ्या फिती बांधून बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध केला. यावेळी पाऊस पडत असताना देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी होती.

राज ठाकरेंनी काढली आंदोलनाची हवा :महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या विरोधात आंदोलन पुकारलं. मुंबईत उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलन केलं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या या आंदोलनातील हवाच राज ठाकरे यांनी नागपुरात काढून घेतली. महाविकास आघाडीच्या काळात महिला अत्याचाराच्या घडलेल्या गुन्ह्याची जंत्रीच राज ठाकरे यांनी वाचून दाखवली. "आता निवडणूक आली म्हणून सरकारला बदनाम करण्यासाठी आंदोलन करता का," असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

हेही वाचा :

  1. राज्यभरात महाविकास आघाडीचं आंदोलन; पुण्यात भरपावसात शरद पवार, सुप्रिया सुळेंचं आंदोलन, मुंबईत उद्धव ठाकरेही सहभागी - MVA Protest In Maharashtra
  2. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; कोर्टाला देखील लेकीबाळी आहेत हे लक्षात घ्या, संजय राऊत यांची न्यायालयावर आगपाखड - Sanjay Raut On MVA Protest

ABOUT THE AUTHOR

...view details