मुंबई MVA Nirdhar Melava Mumbai : महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा आज मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात शिवसेना- उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. "तुम्ही माझा पक्ष चोरला, त्यामुळं मी तुमच्या बुडाला आग लावण्यासाठी मशाल हाती घेतली. आता तुतारीचा मावळा, काँग्रेसचा हात घेऊन यांच्या बुडाला आग लाऊन विजयाची तुतारी फुका," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुती आणि खास करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला. तसंच त्यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराचं रणशिंगही फुंकलं.
उद्धव ठाकरे यांनी डागली भाजपा नेत्यांवर तोफ :उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या निर्धार मेळाव्यात उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांवर मोठा हल्लाबोल केला. त्यांनी माझा शिवसेना पक्ष चोरला, ते चोर आहेत, धनुष्य चोरलं. त्यामुळे त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल हाती घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत मला मशालीच्या प्रचाराला कमी वेळ मिळाला. त्यांनी शरद पवार यांचा पक्ष चोरला, काँग्रेसचा हात त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे तुतारीचा मावळा, काँग्रेसच्या हातात मशाल घेऊन त्यांच्या बुडाला आग लाऊन विजयाची तुतारी फुंका, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य : मुख्यमंत्रीपदाबाबत महाविकास आघाडीमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं दिसून आलं. त्यामुळं आघाडीत सर्वाकाही ठीक नसल्याचं दिसून आलं. आपल्याच पक्षाचा उमेदवार मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षा सर्वच नेते करत आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असं खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली होती. या सर्व चर्चांवर आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
'मविआ' ठरवेल त्याला पाठिंबा : "एकत्रित महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू या, मी त्याला पाठिंबा देईन. काँग्रेस, NCP-SCP यांनीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सुचवू द्या, मी त्याला पाठिंबा देईन," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या दाव्याची हवा काढून टाकली. "आपल्याला लोकांच्या भल्यासाठी काम करायचं आहे. ५० खोके आणि गद्दरांना महाराष्ट्राची जनताच उत्तर देणार असून, त्यांच्या टीकेला मी उत्तर देणार नाही," असा घणाघात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
हेही वाचा -
- दिल्ली दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडी सोपविणार मोठी जबाबदारी? काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा - Assembly Election 2024
- उद्या मार्मिक आमचा आहे, असं कोणी म्हणेल- नाव न घेता उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - Uddhav Thackeray News
- शरद पवार, नाना पटोले यांना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा मान्य आहेत का - भाजपाचा सवाल - Sanjay Raut