महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन वर्षात सरकारनं समाजोपयोगी कामं केली तर या सरकारला आता निरोप द्यायची वेळ - सत्ताधारी विरोधकांची एकमेकांवर टीका - Two years of Mahayuti - TWO YEARS OF MAHAYUTI

Two years of Mahayuti : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामकाजाला आज सुरुवात झाली. अधिवेशनाच्या आज (1 जुलै) चौथ्या दिवशी सकाळी विरोधकांनी आंदोलन करत राज्यात पेपरफुटी विरुद्ध कायदा व्हावा, अशी एकमुखाने मागणी केली. यावर सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रियाही उमटल्या. सरकारला दोन वर्षे झाली. त्यावरही सत्ताधारी आणि विरोधकांनी भाष्य केलं. वाचा सविस्तर वृत्त...

Paper Leakage Issue Maharashtra
पेपरफुटी विरुद्ध कायदा करण्यासाठी विरोधी पक्षाची निदर्शने (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 8:56 PM IST

मुंबई Two years of Mahayuti :आजपासून पावसाळी अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या आज (1 जुलै) चौथ्या दिवशी सकाळी विरोधकांनी आंदोलन करत राज्यात पेपरफुटी विरुद्ध कायदा व्हावा, अशी मागणी करत सरकारचा निषेध केला. तर दुसरीकडे शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड करत राज्यात भाजपासोबत सरकार स्थापन केलं. त्याला आज दोन वर्ष पूर्ण होताहेत. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

आमदार जितेंद्र आव्हाड सरकारच्या धोरणांवर टीका करताना (ETV Bharat Reporter)

आंतरराष्ट्रीय खोके दिन :महायुती सरकारला राज्यात येऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यावर शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांना विचारलं असता, हे सरकार दोन वर्षे घटनाबाह्य म्हणून काम करत आहेत. गद्दारी करून स्थापन झालेलं सरकार आहे. हे खोकेबाज सरकार आहे. यांनी राज्यात काही केलं नाही. त्यामुळे यांच्यावर काय बोलावं हाच प्रश्न आहे? सरकारनं दोन वर्ष पूर्ण केली. याला आंतरराष्ट्रीय खोके दिन असंच म्हणावं लागेल, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तर या दोन वर्षांत राज्यातील प्रश्न तसेच आहेत. कोणत्याच अपेक्षा सरकारनं पूर्ण केल्या नाहीत आणि हे अधिवेशन त्यांचं शेवटचं आहे. या अधिवेशनातून त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

भिडे हे सरकारचे गुरू : संभाजी भिडेंनी भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केलीय. कोण संभाजी भिडे? असा थेट प्रश्नच त्यांनी विचारलाय. त्याचं डोकं फिरलयं. त्याला वेड्यांच्या रुग्णालयात टाकावं. स्वातंत्र्याला अर्वाच्च भाषेतील शब्द वापरणं हा स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे. स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी प्राण दिले. हिंदुंना भिडे हा सर्टिफिकेट देणार आहे का? ही मनुवादी मानसिकता आहे. भिडे हे सरकारचे गुरू आहेत, असं मतही आव्हाडांनी मांडलं.


विरोधकांनी नरेटिव्ह सेट केला :महायुती सरकारला जरी दोन वर्षे पूर्ण झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस ही मागील वर्षी सरकारमध्ये सहभागी झाली आहे. त्यामुळे आम्हाला सरकारमध्ये एक वर्ष पूर्ण झालं आहे. तरी पण या महायुती सरकारनं दोन वर्षांत अनेक समाजपयोगी कामं केलेली आहेत. अनाथांचे नाथ एकनाथ अशी ज्यांची ओळख आहे, असे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळागाळातील घटकांना न्याय देण्याचं काम केलं आहे. शेतकरी, मजूर, महिला, विद्यार्थी या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम या सरकारनं केलं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. पावभाजी विक्रेत्याला घातला सायबर गंडा, कर्जासाठी अ‍ॅपवर घेतली वैयक्तिक माहिती, नवीन कायद्यानुसार मुंबईत पहिला गुन्हा दाखल - Cyber Criminal Cheated Businessman
  2. विधानपरिषदेच्या चार जागांचे आज निकाल लागणार, तीन मतदारसंघातील मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण - Vidhan Parishad Election Result
  3. हैदराबादचे अब्दुल चाचा करतात वारकऱ्यांची सेवा, 25 वर्षांपासून सेवा देण्यात त्यांना मिळतोय आनंद - Ashadhi wari 2024

ABOUT THE AUTHOR

...view details