गोंदिया :आपल्या प्रियकराला भेटायला जाण्यासाठी शहरातील एका कॉलनीतील दोन अल्पवयीन मुलींनी दुचाकी चोरल्याची घटना घडली. याबाबत गोंदिया शहर पोलिसांत वाहन मालकानं तक्रार केली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलं आहे.
प्रियकराला भेटाण्सासाठी चोरली दुचाकी : गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका कॉलनीमधून गुरूवारी (दि.५) सकाळी १०:३०च्या सुमारास दोन अल्पवयीन मुलींनी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी दुचाकी चोरली. ही दुचाकी चोरणाऱ्या दोन्ही मुलींनी अगोदर कॉलनीत फिरत रेकी केली. यानंतर काही वेळातच गाडीची चोरी केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सीसीटीव्हीत टिपल्यानं फुटलं बिंग : या प्रकरणी वाहन मालकानी गोंदिया शहर पोलिसात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गाडीचा शोध सुरू केला. तपासावेळी कॉलनीमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, दोन मुली परिसरात रेकी करत असल्याचं आढळलं. यानंतर त्यांनी गाडीची चोरी केली. गोंदिया शहर पोलिसांनी शनिवारी (दि.८) या दोन्ही मुलींना ताब्यात घेतलं असून, गाडी जप्त केली आहे. पुढील तपास गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.