नवी दिल्ली : तिहेरी हत्याकांडानं दिल्ली हादरली असून एकाच कुटुंबातील पती, पत्नी, आणि मुलीचा निर्घृण खून करण्यात आला. तर मुलगा सकाळी फिरायला गेल्यानं बचावला आहे. ही घटना दक्षिण दिल्लीतील नेब सराय पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या देवळी गावात बुधवारी सकाळी घडली. फिरुन आल्यानंतर आई, वडील आणि बहीण असे तीन जण रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्यानं मुलावर दुखाचा डोंगर कोसळला. राजेश तंवर (55), कोमल तंवर (47) आणि त्यांची मुलगी कविता तंवर (23) अशी मृतांची नावं आहेत.
दिल्लीत पती, पत्नी आणि मुलीचा खून :दिल्लीतील नेब सराय पोलीस स्टेशन परिसरात एकाच कुटुंबातील तिघांचा खून करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. राजेश (55), कोमल (47) आणि त्यांची मुलगी कविता (23) हे घरात झोपलेले होते. तर त्यांचा मुलगा सकाळी फिरण्यासाठी बाहेर गेला होता. मात्र तो फिरुन परतल्यानंतर त्याला घरी तिघंही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तिघांचाही मृत्यू झाल्यानं त्यानं मोठा आरडाओरडा केला. ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरुन मोठी खळबळ उडाली. मृतेदह पाहण्यासाठी घराबाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आत्ताच काही बोलणं घाईचं आहे. मारेकऱ्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तिहेरी हत्याकांडानं हादरली दिल्ली : पती पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून (ETV Bharat) मुलानं बाहेर जाताना आईला सांगितलं दरवाजा बंद करायला :मिळालेल्या माहितीनुसार, मृत राजेश यांचा मुलगा सकाळी फिरायला गेला. घरी आल्यानंतर आई, वडील आणि बहिणीचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यानं तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच नेब सराय पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचलं. गुन्हे शाखेच्या पथकालाही तपासासाठी घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. या तिघांचा खून कशामुळे करण्यात आला याबाबतची माहिती समजू शकलेली नाही. सकाळी मुलानं बाहेर जाताना आईला दरवाजाला कुलूप लावायला सांगितलं होतं. मात्र मुख्य दरवाजाला आतून आणि बाहेरून इंटरलॉक सिस्टम आहे, अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली.
लग्नाच्या वाढदिवशीच तिघांचा खून :मृत राजेश यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. आजूबाजूच्या नागरिकांशी त्यांचा फारसा संवाद नव्हता. त्यामुळे नागरिकांना त्यांच्याविषयी फारशी माहिती नाही. या प्रकरणी नेब सराय पोलीस मृत राजेश यांचा मुलगा आणि शेजारच्या नागरिकांची चौकशी करत आहेत. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरेही तपासत आहेत. तांत्रिक माहितीचीही मदत घेतली जात आहे.
हेही वाचा :
- दोन विवाहित महिलांचं 'सूरज'सोबत लफडं; वादातून एकीनं केली दुसरीची हत्या
- क्राईम पेट्रोल पाहून केला आई-वडिलांसह भावाचा खून, रक्ताच्या एका थेंबानं उलगडलं रहस्य
- फिरोजपूर तिहेरी हत्याकांडातील मारेकरी समृद्धीनं आले शहरात, जीव मुठीत घेऊन पोलिसांनी ठोकल्या 7 शार्प शूटरला बेड्या - Firozpur Triple Murder Case