महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-सातारा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! खंबाटकी घाटात काय आहे परिस्थिती? जाणून घ्या... - Khambatki Ghat - KHAMBATKI GHAT

Khambatki Ghat : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही पुणे-सातारा प्रवास करत असाल, तर तुमचा खोळंबा होवू शकतो. कारण, खंबाटकी घाटात सकाळपासून ट्रॅफीक जाम आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे.

Khambatki Ghat
खंबाटकी घाट (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 5:52 PM IST

सातारा Khambatki Ghat : पुणे-सातारा महामार्गावर सकाळपासून वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) पाहायला मिळत आहे. सध्या पावसाचं वातावरण आहे. त्यातच शनिवार, रविवारच्या सुट्टीनंतर मुंबईकडं जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशातच गाड्या बंद पडल्यानं खंबाटकी घाटातील वाहतूक विस्कळीत होऊन ट्रॅफीक जाम झालं आहे. त्यामुळं वाहन चालकांना मोठा त्राास होत आहे.

खंबाटकी घाटात वाहतुक कोंडी (ETV BHARAT Reporter)



खंबाटकी घाटात वाहतुकीची कोंडी :पुणे-सातारा मार्गावरील खंबाटकी घाटात असलेल्या दत्त मंदिर कॉर्नरजवळ एक गाडी बंद पडल्यानं घाटात वाहनांच्या दोन किलोमीटपर्यंत रांगा लागल्या आहेत. सकाळपासूनच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ट्रॅफीक जाम होवून वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच पावसाच्या सरी कोसळत असल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे.



मुंबई, पुण्याकडं जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली: सकाळपासूनच खंबाटकी घाटात रिमझिम पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळं गावी आणि पर्यटनासाठी बाहेर पडलेले लोक सध्या परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळं महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. गेले अनेक तास वाहनं खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडीत अडकली आहेत.



वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस दाखल : खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडीत इंजिन गरम झाल्यानं अनेक वाहनं बंद पडली आहेत. त्यामुळं वाहतूक कोंडीत भर पडली आहे. ट्रॅफीक जाममुळं पुणे-सातारा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. महामार्ग पोलीस खंबाटकी घाटात दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा -

  1. पर्यटकांसाठी महत्वाची बातमी.. महाबळेश्वरकडे येणा-जाणाऱ्या वाहतुकीत जून महिन्यात बदल
  2. चिखलदरा येथील भीमकुंड पर्यटकांसाठी दोन दिवस बंद, जाणून घ्या कारण - Chikhaldara Bhimkund
  3. साताऱ्यातील 'या' किल्ल्यावर पर्यटकांना तीन दिवस बंदी; महाबळेश्वर, पाचगणीत पर्यटकांची गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details