महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज असण्याचे कारण नाही, पत्राबाबत उदय सामंत म्हणतात... - UDAY SAMANT ON PRINCIPAL SECRETARY

मी कुठेही उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज नाही. नाराज असण्याचे कारण नाही, असा खुलासा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज केलाय.

State Industries Minister Uday Samant
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2025, 4:38 PM IST

Updated : Feb 10, 2025, 5:02 PM IST

मुंबई-राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे गेल्या काही दिवसांपासून उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या कार्य प्रणालीवर नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले होते. यानंतर मंत्री उदय सामंत हे उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र मी कुठेही उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज नाही. नाराज असण्याचे कारण नाही, असा खुलासा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज केलाय. सोमवारी बाळासाहेब भवन येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

निर्णयाची माहिती हवी : “मी उद्योगमंत्री या नात्याने 4 फेब्रुवारी रोजी उद्योग खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले. पण हे पत्र तुमच्या हाती उशिरा मिळाले. मंत्री म्हणून प्रशासनाचे जे धोरणात्मक निर्णय होतात, त्याची कल्पना मला असावी, अशी पत्रातून अपेक्षा व्यक्त केली. कारण निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती मला जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठल्याही निर्णयांची माहिती असणं आवश्यक आहे. एवढेच मी पत्रातून म्हटलं आहे. याचा अर्थ मी नाराज आहे असा होत नाही, असा खुलासा आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Source- ETV Bharat)

नाराज असण्याचे कारण नाही : पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, सत्तेचं विकेंद्रीकरण जसं राजकारणात महत्त्वाचं असतं. तसे अधिकाऱ्यांच्या बाबतीतही महत्त्वाचं असतं. मी यापूर्वीही अनेक खात्यांची जबाबदारी पार पाडली आहे. सगळ्याच कामांसाठी सहीसाठी मंत्र्याकडे येण्याची गरज नाही. काही गोष्टी ह्या सचिवांच्या पातळीवर सोडविण्याची गरज आहे, अशी भूमिका मी पत्रातून मांडली. याचा अर्थ मी नाराज नाही. किंवा नाराज असण्याच काहीच कारण नाही, असंही मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय.

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्री अन् राज ठाकरेंच्या भेटीमुळे काहीही फरक पडत नाही, संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
  2. देवेंद्र फडणवीसांचा शिंदेंना धक्का अन् अजित पवारांना ताकद; राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीतून शिंदेंना वगळलं
Last Updated : Feb 10, 2025, 5:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details