महाराष्ट्र

maharashtra

लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; भाजपाच्या माजी नगरसेवकावर बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 8:12 PM IST

Thane Rape Case : कल्याण पूर्वेतील एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भाजपाच्या माजी नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार आहे.

Thane Rape Case
संग्रहित छायाचित्र

ठाणे Thane Rape Case : कल्याण पूर्वेतील कैलासनगर प्रभागाचे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक तथा बाधंकाम विकासक मनोज रामशकल राय यांच्या विरुद्ध एका 40 वर्षीय महिलेनं बुधवारी बलात्काराचा आणि लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. या पीडितेच्या तक्रारीवरुन मनोज रामशकल राय यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानं खळबळ उडाली आहे.

पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन माजी नगरसेवक मनोज राय यांच्यावर भादंवि कलम 376,(2), 313, 323, 504 आणि 506 प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मनोज राय हे फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. - राजेंद्र शिरसाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी पोलीस ठाणे

लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध : कल्याण पूर्वेतील राय रेसिडेन्सी गृह प्रकल्पाचे मनोज राय हे मुख्य प्रवर्तक आहेत. गृहिणी असलेल्या 40 वर्षाच्या तक्रारदार पीडित महिलेनं कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटलं आहे, की "सन2015 ते मे 2022 या कालावधित भाजपाचे माजी नगरसेवक मनोज रामशकल राय यांनी आपणास लग्नाचं आमिष दाखवून आपल्या राहत्या घरी येऊन वेळोवेळी आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले. या शारीरिक संबंधांमुळं मनोज राय यांच्यापासून चारवेळा गर्भवती राहिले. आपल्या इच्छेविरुद्ध हा सगळा प्रकार मनोज राय यांनी केला. गर्भवती राहिल्यानंतर चार वेळा आरोपी राय यांनी आपणास दमदाटी, शिवीगाळ, मारझोड आणि धमकी देऊन गर्भपात करण्यास जबरदस्तीनं भाग पाडलं. आपण या प्रकरणी कुठं बोलू नये, म्हणून आपणास सतत मारहाण केली जात होती. आता हा सगळा प्रकार असह्य झाल्यानं आणि लग्नाचं आमिष दाखवूनही ते मागील नऊ वर्षाच्या कालावधीत न पाळल्यानं आपण ही तक्रार माजी नगरसेवक मनोज राय यांच्या विरूद्ध करत आहोत," असं पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.

मारहाण आणि त्रासाला कंटाळून केली तक्रार :पीडित महिलेनं लग्नासाठी हट्ट केल्यावर तिला मारहाण करण्यात आली. त्यासह तिला शिवीगाळ आणि वेगवेगळ्या धमक्या देण्यात आल्या. या सर्व त्रासाला कंटाळून पीडितेनं अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर राय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट यांनी "या तक्रारीची गंभीर दखल घेऊन माजी नगरसेवक मनोज राय यांच्यावर भादंवि कलम 376,(2), 313, 323, 504 आणि 506 प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मनोज राय हे फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत," अशी माहिती दिली. तर या प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी माजी नगरसेवक तथा विकासक मनोज राय यांना सतत भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता, त्यांचा मोबाईल बंद येत होता.

  • जमिनीच्या वादातून मालकाला मारहाण :यापूर्वीही ऑगस्ट 2020 मध्ये एका जमिनीच्या वादातून कुटूंबासह जमीन मालकाला हाणामारी केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक मनोज राय यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. त्यावेळीही राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा :

  1. लग्नाच्या बहाण्यानं आर्थिक सल्लागारावर बलात्कार; 'सीए'ला अटक
  2. शेजार धर्माला काळिमा; 3 वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न, नराधमास अटक
  3. लग्नाच्या बहाण्यानं मुंबईतील महिलेवर राजस्थानात सामूहिक बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details