महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भावाचे मिसकॉल पाहून काळजीनं शोधायला गेली बहीण, सहा नराधमांकडून सामूहिक अत्याचार - GANGRAPE IN THANE

महिलेवर सहा नराधमांकडून सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून सहा नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

GANGRAPE IN THANE
भिवंडीत तरूणीवर सामूहिक अत्याचार, शांती नगर पोलीस स्टेशन (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2025, 6:42 AM IST

ठाणे : भावाचे मोबाईलवर मिसकॉल पाहत त्याच्या काळजीनं धाव घेणाऱ्या २२ वर्षीय महिलेवर सहा नराधमांकडून सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून सहा नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल :महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात सहा नराधमांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद सईद आलम, पाशा, लड्डू, गोलू आणि इतर दोन अनोळखी अशी नराधमांची नावे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

रिक्षाचालकाला आणि भावाला केली मारहाण :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार "२२ वर्षीय पीडित महिला भिवंडी शहरात राहते. ती २० फेब्रुवारीला आपल्या मावशीच्या घरी झोपली होती. झोपेतून जाग आल्यानंतर तिनं आपला मोबाईल तपासला असता मोबाईलवर भावाचे १५ मिसकॉल आल्याचं बघितलं. यानंतर लगेच तिनं भावाला फोन केला असता तिला भावाची तब्येत ठीक नसल्याचं कळालं. त्यानंतर ती २१ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास तातडीनं रिक्षानं भाऊ वाट बघत असलेल्या ठिकाणी गेली. या ठिकाणी नराधमांनी तिच्या भावासह रिक्षाचालकाला मारहाण करून पिटाळून लावलं. यानंतर तिच्यावर सहा नराधमांनी अत्याचार केला."

नराधमांच्या तावडीतून केली सुटका :पीडितेनं नराधमाच्या तावडीतून आपली सुटका करत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत पुढील तपासासाठी शांतीनगर पोलीस ठाण्यात वर्ग केला. या संर्दभात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली. "पीडितेवर सामुहिक अत्याचार झाला असून या घटनेत सहा आरोपी आहेत. या गुन्ह्यातील एक आरोपी अटक केली असून इतर ५ आरोपीचा दोन पोलीस पथक शोध घेत आहे,"असे त्यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार यामधील एक आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीदेखील गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा :

  1. हैदराबाद न्यायालयाची नवनीत राणांना नोटीस, लोकसभा निवडणुकीत केलं होतं आक्षेपार्ह विधान
  2. माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरण: घटनात्मक तरतुदींनुसार कारवाई होणार, राहुल नार्वेकरांनी दिली माहिती
  3. अल्पवयीन मुलीबरोबरच्या संबंधातील आरोपीला न्यायालयानं दिला जामीन; प्रेम संबंधाकडं वेधलं लक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details