ठाणे -मालकाला लुटणाऱ्यागुन्ह्यात आंतरराष्ट्रीय नेपाळी टोळीचा सहभाग आहे. मात्र, यातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. पोलीसही त्याचाही शोध घेत आहेत. पोलिसांनी या टोळीतील त्रिकुटाकडून चोरलेल्या मुद्देमालापैकी लाखो रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
लीलबहादूर लालबहादूर कामी (45, चायनीज हॉटेलातील हेल्पर, रा. जयराम म्हात्रे यांचा सद्गुरू कृपा बंगला, सेक्टर 10, कामोटे, नवी मुंबई), टेकबहादूर जगबहादूर शाही (40) आणि मनबहादूर रनबहादूर शाही (45, व्यवसाय - हेल्पर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही नेपाळ देशातील रहिवासी आहेत. यातील लीलबहादूर कामी याला पोलिसांनी नवी मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. तर टेकबहादूर शाही आणि मनबहादूर शाही या दोघांना कर्नाटक राज्यातील बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहेत.
आरोपींनी अशी केली चोरी - पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार पश्चिम डोंबिवलीतील राजू नगर परिसरात असलेल्या धनश्री अपार्टमेंटमध्ये राहणारे कुंदन हरिश्चंद्र म्हात्रे (31) यांच्या तक्रारीतून शनिवारी 27 जुलै रोजी विष्णूनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार कुंदन म्हात्रे यांच्याकडे सागर विर्श्वकर्मा उर्फ थापा (मूळ रा. नेपाळ) हा नोकर कामाला होता. हा नोकर त्यांच्याकडे दीड वर्षांपासून घरकामाला होता. आरोपी सागर यानं बिल्डींगचे मेन गेट तोडले. त्यानंतर बेडरुममधील कपाटे उचकटून त्यातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, 10 विविध कंपन्यांची घड्याळे, भारतीय चलनातील रोख रक्क्म, डॉलर व युरो असा 15 लाख 52 हजार 807 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.