महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये सैन्य दलाच्या चौकीवर दहशतवादी हल्ला; 5 जवान आणि 1 पोलीस अधिकारी जखमी - terrorist attack in Jammu Kashmir - TERRORIST ATTACK IN JAMMU KASHMIR

terrorist attack in Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये डोडा येथील भारतीय सैन्य दलाच्या चेकपोस्टवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैन्यदलाचे पाच जवान आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचा एक विशेष पोलीस अधिकारी असे सहा जण जखमी झाले आहेत.

terrorist attack  in Jammu Kashmir
terrorist attack in Jammu Kashmir (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 12:32 PM IST

श्रीनगर terrorist attack in Jammu Kashmir :डोडा जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सैन्य दलाचे पाच जवान आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचा एक विशेष पोलीस अधिकारी असे सहा जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दहशतवाद्यांनी मध्यरात्री 1:45 वाजता डोडा येथील छत्तरगल्ला भागातील सैन्यदल आणि स्थानिक पोलिसांच्या चेकपोस्टवर हल्ला केला. जखमींना भदेरवाह शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलंय.

शोधमोहिम सुरू :कठुआ जिल्ह्यात कूटा मोरहुंदर हिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळील सैदा सुखल गावात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. सीआरपीएफच्या मदतीनं परिसराची नाकेबंदी केली असून घरोघरी पाहणी करत दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद जैन म्हणाले, "दोन दहशतवादी सीमेपलीकडून घुसलेले दिसले. ते रात्री 8 च्या सुमारास सैदा सुखल गावात आले. त्यांनी एका घरातून पाणी मागविल्यानंतर लोक घाबरले. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी आणि स्टेशन हाऊस ऑफिसर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचं पथक गावात दाखल झालं."

एक दहशतवादी ठार : एडीजीपीच्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्याच्या ताब्यातून एके असॉल्ट रायफल आणि एक रक्सॅक जप्त केलीय. हा दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित आहे, याबाबत तपास सुरूय. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ग्रेनेड फेकण्याचा प्रयत्न करणारा दहशतवादी ठार झाला. तर दुसरा दहशतवादी गावात लपून बसलाय.

रियासी येथे दहशतवाद्यांकडून बसवर हल्ला :जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा बसवर दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला करण्यात लष्कर-ए-तैयबाचा कमांडर अबू हमजाचा हात होता. रियासी येथे दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करून त्यांना लक्ष्य केलं होतं. गोळीबारात चालकाचं नियंत्रण सुटलं त्यामुळं बस खड्ड्यात पडली. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा

  1. सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात छत्रपती संभाजी नगरातील तरुणाचा सहभाग - Salman Khan
  2. वृत्तवाहिनीच्या अँकरला मारहाण, कपडेही फाडल्याचा आरोप; दिल्ली देहराडून महामार्गावर नराधमांचं 'तांडव' - News Channel Anchor Molested
  3. 'ड्रिमगर्ल'च्या मधाळ बोलण्याला भुलला उच्चपदस्थ अधिकारी ; अलवरच्या 'स्वामी'नं केलं ब्लॅकमेल - Fraud By Posing As A Girl

ABOUT THE AUTHOR

...view details