महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिहेरी अपघातात 1 जण ठार 3 जण गंभीर जखमी, तर बैलाचे मोडले पाय - Triple Accident In Beed

Triple Accident In Beed : भरधाव कारनं दुचाकीला मागून धडक दिली. यानंतर बाजूला जाणाऱ्या बैलगाडीलाही टक्कर मारली. या अपघातात 1 व्यक्ती जागीच ठार झाला. तर तिघं गंभीर जखमी झाले. ही घटना बीड जिल्ह्यातील तेलगावहून माजलगावकडे येताना घडली.

Triple Accident In Beed
बीड अपघात (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 6:00 PM IST

बीडTriple Accident In Beed:जिल्ह्यातील तेलगावहून माजलगावकडं येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या कारनं धडक दिली. त्यानंतर भरधाव चारचाकीनं बाजुनं जाणाऱ्या बैलगाडीला धडक दिली. या तिहेरी अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन वर्षांच्या बालकासह अन्य तीन जण जखमी झाले. हा अपघात खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील नित्रुड इथं घडला.

वाहनाच्या धडकेत बैलाचेमोडलेपाय :खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी सहा वाजता तेलगावहून माजलगावकडं येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 44- E 8040 या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या चारचाकी क्रमांक MH-25 AS 8766 या वाहनानं जोराची धडक दिली. याचवेळी चारचाकीनं बाजुनं चालत असलेल्या बैलगाडीलाही धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक रतन कांबळे (वय 45) यांच्या डोक्याला मार लागल्याचे ते जागीच ठार झाले तर त्यांच्याबरोबर असलेले दुचाकीवरील मनीषा सुरेश वाघमारे ( वय 40 ), लक्ष्मी लखन कदम (30) आणि कार्तिक लखन कदम (वय 3) हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, या वाहनानं बैलगाडीला धडक दिल्यानं दोन्ही बैलांचे पाय मोडले आहेत.

वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात :बीड जिल्ह्यात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. भरधाव वेगानं येणारी वाहनं यांचा वाहनावरील ताबा सुटल्यानं देखील अपघात होत असल्याचं आपण पाहत आहोत. असाच हा अपघात माजलगावकडून येणाऱ्या दुचाकीला चारचाकी गाडीनं जोराची धडक दिली. त्यानंतर चारचाकीनं बाजूला चालत असलेल्या बैलगाडीला देखील धडक दिली. यामुळे हा तिहेरी अपघात झाला. चारचाकी वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा प्रकार घडला असल्याचं प्रथम निदर्शनास येत आहे.

हेही वाचा :

  1. भरधाव वेगातील आलिशान कारची दुचाकीला धडक, पार्टीहून परतणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू - Pune Accident
  2. 'जॉली एलएलबी 3'चं राजस्थानमधील शूटिंग पूर्ण होताच अक्षयचा दिलदारपणा, ५०० मुलींकरिता जाहीर केली मदत - jolly llb 3 Movie
  3. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपासह अजित पवारांचा होता विरोध, संजय राऊत यांनी 'हे' सांगितलं कारण - Sanjay Raut news

ABOUT THE AUTHOR

...view details