नाशिकTen people died due to swine flu : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जून महिन्यात नाशिक शहरात स्वाइन फ्लूचे पाच, तर ग्रामीण भागात एक नवा रुग्ण आढळला होता. तसंच नाशिक शहरातील स्वाइन फ्लू बाधितांची संख्या 35 वर पोहचलीय. नाशिक शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 25 वर गेली आहे. आतापर्यंत दहा जणांचा स्वाइन फ्लूनं बळी घेतला आहे. यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून आरोग्य प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
शहरात स्वाइन फ्लूचे 23 रुग्ण :नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळं आतापर्यंत दहा जणांचा बळी गेल्यानं भीतीचं वातावरण आहे. विशेषतः या आजाराला सध्याचे बदलते हवामान पोषक ठरल्याचं दिसून येत आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरात स्वाइन फ्लूचे 23 रुग्ण आढळले होते. एप्रिल महिन्यात जेलरोड येथील 59 वर्षीय डॉक्टरचा स्वाईन फ्लूमुळं मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. त्या पाठोपाठ सिन्नर मधील दातली येथील 63 वर्षीय महिला, मालेगाव येथील 65 वर्षीय रुग्ण, तसंच 29 वर्षीय रुग्ण, निफाड येथील 68 वर्षीय महिला रुग्ण, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील 65 वर्षीय महिला नाशिकमध्ये दाखल झाली होती, तिचाही स्वाईन फ्लूमुळं मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे शहरातील जेलरोड भागातील 58 वर्षीय सेवानिवृत्त एअर फोर्स कर्मचाऱ्यांचा मृत्यू स्वाइन फ्लूनं बळी घेतला आहे. दिंडोरीत 42 वर्षीय महिला, चांदवड तालुक्यातील तिसगाव येथील 50 वर्षीय रुग्णाचा स्वाइन फ्लूनं मृत्यू झालाय. आता चार दिवसापूर्वी निफाड तालुक्यातील शिरवाडे येथील 58 वर्षीय रुग्णाला नाशिक शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. 20 जून रोजी त्याचाही स्वाइन फ्लूनं मृत्यू झाल्याचं समोर आलंय.
असा होतो स्वाइन फ्लूचा प्रसार :स्वाईन फ्लू विषाणूचा शिंक, खोकला, तसंच हवेतून प्रसार होतो. तसंच संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या नाक, तोंडला स्पर्श केल्यानं विषाणूचा संसर्ग होतो. त्यामुळं लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असं आवाहन नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केलं आहे.