महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दादर चैत्यभूमी येथे मतदार जनजागृतीसाठी विशेष स्वाक्षरी मोहीम; मुख्यमंत्री, राज्यपालांचा मोहिमेत सहभाग - Mumbai District Office Campaign

Voter Awareness Campaign : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी वाढवणे आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मुंबई शहर जिल्हा कार्यालयाच्यातर्फे विशेष स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांनी स्वाक्षरी करून मोहिमेत सहभाग घेतला.

Voter Awareness Campaign
विशेष स्वाक्षरी मोहीम

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 9:52 PM IST

मुंबईVoter Awareness Campaign:३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १८१-माहीम विधानसभा मतदारसंघ यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वाक्षरी मोहीम उपक्रमास राज्यपाल रमेश बैस यांनी भेट देऊन स्वाक्षरी फलकावर सही करून मतदारांनी २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नवीन मतदारांची नोंदणी वाढवणे तसेच जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वजनिक निवडणुकीकरिता मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने (Systematic Voters Education & Electoral Participation) समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

मुख्यमंत्र्यांनीही नोंदवला सहभाग :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज (14 एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांनी चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भीमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान जनजागृती मोहिमेतील फलकावर स्वाक्षरी करून लोकशाहीने दिलेला आपणाला मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा असं लोकांना आवाहन केलं. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. आश्विनी जोशी यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर आदींसह विविध मान्यवरांनी स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करत मतदानाचा हक्क बजावणार असल्याची ग्वाही यानिमित्ताने दिली. याप्रसंगी माहीम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अमोल कदम यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी या विशेष मोहीमेसाठी पुढाकार घेतला.

हेही वाचा :

  1. गेल्या 50-60 वर्षांत काँग्रेसला करता आलं नाही ते मोदींनी केलं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Lok Sabha Election 2024
  2. शिंदे गटाच्या आमदाराचा शरद पवार गटाच्या आमदारावर घोटाळ्याचा गंभीर आरोप; काय आहे नेमकं प्रकरण? - Navi Mumbai Market Committee
  3. धैर्यशील मोहिते पाटलांच्या हातात 'तुतारी'; भाजपाला मोठा धक्का, कसंय माढ्याचं समीकरण? - Dhairyasheel Mohite Patil joins NCP

ABOUT THE AUTHOR

...view details