महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"अयोध्यावासीयांबद्दल लाज वाटते", भाजपाचा पराभव दिसताच सोनू निगमची वादग्रस्त पोस्ट - Sonu Nigam controversial post - SONU NIGAM CONTROVERSIAL POST

अयोध्येत राममंदिर उभारल्यानंतरही भाजपाला येथे जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार लालू सिंह मताच्या मोठ्या फरकानं पिछाडीवर आहेत. सपाचे उमेदवार अवधेश कुमार यांनी या मतदार संघात कडवी झुंज दिली आहे.

Sonu Nigam's controversial X post
सोनू निगमची वादग्रस्त पोस्ट (ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 4:02 PM IST

मुंबई- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक अनपेक्षित निकाल लागत आहेत. यावेळी 400 पारचा नारा देणाऱ्या एनडीएचा (भाजपा + मित्रपक्ष) बहुमताचा आकडा मिळण्यासाठीही संघर्ष सुरू आहे. इंडिया आघाडीच्या निवडणुतकीतील कामगिरीनं सर्वांनाच चकीत केलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष 35 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागांवर आघाडीवर आहे. अयोध्या राम मंदिरासारख्या मोठ्या मुद्द्यावरूनही भाजपाला येथे विजयासाठी झटावं लागत आहे, अशा स्थितीत बॉलिवूड गायक सोनू निगमनं अयोध्येतील लोकांसाठी एक्स (पूर्वीचे ट्विटर) एक वादग्रस्त संदेश पोस्ट केला आहे. यामध्ये त्यानं अयोध्येतील जनतेवर आपला राग व्यक्त केला आहे.

सोनू निगमने पोस्टमध्ये लिहिलंय, "ज्या सरकारनं संपूर्ण अयोध्या उजळून टाकली, नवीन विमानतळ दिलं, रेल्वे स्टेशन दिलं, 500 वर्षांनंतर राम मंदिर बांधलं. संपूर्ण मंदिर अर्थव्यवस्था निर्माण केली आहे त्याच पक्षाला अयोध्येतील लोकसभेच्या जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे. अयोध्यावासीयांबद्दल लाज वाटते."

फैजाबाद लोकसभा निवडणुकीची परिस्थिती

राम मंदिरासारखा सर्वात मोठा हिंदू मुद्दा देशाला देणाऱ्या भाजपाची अयोध्येत अडचण वाढली आहे. येथे सुरुवातीच्या टप्प्यापासून समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद 20 हजराहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. दुपारी 3.20 वाजेपर्यंत 353264 लाख मते मिळवून ते पहिल्या क्रमांकावर आहेत. तर भाजपचे उमेदवार लालू सिंह 332985 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

अयोध्येमध्ये अवधेश प्रसाद यांची भाजपावर आघाडी

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीचं मतमोजणी सुरू झाल्यानंतर चकित करणारे निकाल सुरुवातीपासून दिसू लागले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त जागा मिळणार अशा प्रकारचा आत्मविश्वास भाजपाच्या नेत्यामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्येही होता. परंतु जनतेचा कौल अनपेक्षित कलाटणी देणारा होता. लोकसभेच्या 80 जागा असलेल्या या विशाल प्रांतात भाजपाला आतापर्यंत 38 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर इंडिया आघाडीत असलेल्या काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला 41 जागांवर आघाडी मिळाली आहे. यामध्ये अयोध्या ज्या लोकसभा मतदार संघात येतं त्या फैजाबादमध्ये भाजपाच्या लल्लू सिंग यांच्यावर समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी 382267 इतकी मतं मिळवत 24853 मतांची आघाडी घेतली आहे.

हेही वाचा -

  1. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक; नारायण राणेंना मोठी आघाडी
  2. अजित पवारांना दे धक्का! सुप्रिया सुळे विजयाच्या उंबरठ्यावर
  3. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details