महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षणाचा तिढा सुटला; मुंबई डबेवाल्यांनी मानले सरकारचे आभार - Maratha Reservation Issue

Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणाचा तिढा सुटला आहे. याबाबत मुंबई डबेवाल्यांनी सरकारचे आभार मानले आहेत. (Mumbai Dabewala) डबेवाले कामगार संघटनेचे कार्यकर्ते आज (27 जानेवारी) दादर येथील कार्यालयात एकत्रित आले. (Manoj Jarange Patil) यावेळी त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा केला.

Maratha Reservation Issue
मराठा आरक्षण

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 4:08 PM IST

मुंबईMaratha Reservation Issue:अनेक दशकांचा संघर्ष, अनेक बलिदान आणि मोर्चे यांची फलश्रुती होऊन मराठा समाजाला न्याय प्राप्त झाल्याने समस्त मुंबई डबेवाले कामगार वर्गाने समाधान व्यक्त करत हा विजय साजरा केला आहे. (Cheers from Mumbai Dabewala) मराठ्यांना मिळालेल्या यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी मुंबईच्या विविध विभागातून डबेवाले कामगार आज दादर येथील कार्यालयात एकत्रित जमा झाले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून, पेढे वाटून, गुलाल उधळत मराठ्यांच्या विजयाचा आनंदोत्सव थाटामाटात साजरा केला.


मैलाचा दगड ठरणारा शासन निर्णय :मुंबईतील तमाम डबेवाल्यांनी आज एकत्रित येत मराठा आरक्षणाचा विजय दणक्यात साजरा केला. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांची मराठा समाजाची पिछेहाट आणि ससेहोलपट दूर करणारा मैलाचा दगड ठरणारी शासनाची अधिसूचना आज घोषित झाली. यामुळे राजकीय, शैक्षणिक आणि नोकऱ्यांत आता गुणवत्ता डावलली जाणार नाही याची शाश्वती देणारा हा निर्णय ठरावा हीच अपेक्षा डबेवाल्यांच्या वतीनं याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.


डबेवाल्यांनी केली अन्नदानाची व्यवस्था :लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं आरक्षणाची मागणी घेऊन कूच करत होते. यावेळी जरांगे पाटलांनी केलेल्या आवाहनाखातर मुंबई डबेवाले संघटना शिष्टमंडळ आणि कार्यकारिणीने ट्रस्ट अध्यक्ष उल्हास मुके, मंडळ अध्यक्ष रामदास करवंदे यांच्या आदेशाने संपूर्ण डबेवाले कामगार हे मोर्चात सहभागी मराठा बांधवांच्या जेवणाची व्यवस्था पाहत होते. एकही मराठा बांधव उपाशी राहता कामा नये यासाठी नवी मुंबईत तळ ठोकून होते. नवी मुंबई, उल्हासनगर विभागातील डबेवाले कामगार आणि महिला वर्गाने सतत अविरत मेहनत घेत अन्नदानात खंड पडू नये म्हणून जेवण तयार करण्यासाठी मेहनत घेतली. त्या सर्व महिलांचे, पदरमोड करून आर्थिक योगदान देणाऱ्या कामगार वर्गाचे आणि आपले घरदार, कुटुंब सोडून आपल्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोर्चात सहभागी झालेल्या करोडो मराठा बांधवांचे मुंबई डबेवाले संघटनेच्या वतीनं प्रवक्ते विष्णू काळडोके यांनी याप्रसंगी आभार मानले.

हेही वाचा:

  1. मराठ्यांचा ऐतिहासिक विजय! आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत सर्वांना ओबीसींच्या सुविधा मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
  2. जरांगेंच्या मागण्यांवर सरकारनं काढली अधिसूचना, काय आहे अधिसूचनेत; मध्यरात्री काय घडलं?
  3. मनोज जरांगेंच्या लढ्याला यश, मराठा आंदोलकांचा नवी मुंबईत जल्लोष

ABOUT THE AUTHOR

...view details