पुणे Vanraj Andekar murder : वनराज आंदेकर खून प्रकरणी समर्थ पोलिसांनी जयंत लक्ष्मण कोमकर, प्रकाश जयंत कोमकर,संजीवनी जयंत कोमकर (रा. ३०९, नाना पेठ,आणि कल्याणी कोमकर यांना अटक केली आहे. याप्रकरणी गणेश लक्ष्मण कोमकर, सूर्यकांत ऊर्फ बंडू राणूजी आंदेकर (वय ६८, रा. सोनाई दादा निवास, नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
वनराज आंदेकर खुनासंदर्भात माहिती देताना पोलीस अधिकारी (ETV Bharat Reporter) धारदार शस्त्राने हल्ला -याबाबत सहा. पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले की, काल रात्री समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत इनामदार चौक येथे वनराज आंदेकर आणि त्याचा चुलत भाऊ उभे असताना 12 ते 15 जण हे वेगवेगळ्या मोटार सायकलवर तिथं आले. त्यांनी त्यांच्यावर फायरींग करत धारदार शस्त्राने हल्ला केला आणि या हल्ल्यात त्यांचं निधन झालं. त्यांची बॉडी ससून रुग्णालयात पाठवण्यात आली असून तिथं पोस्टमाटम सुरू आहे. या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली असून बाकीच्या लोकांचा तपास सुरू आहे, असं यावेळी शर्मा म्हणाले.
याला मारा... याला मारा...-ते पुढे म्हणाले की, प्राथमिक दृष्ट्या ही जी घटना घडली आहे ती कौटुंबिक वाद, प्रॉपर्टीचा वाद आणि जुने वाद यावरून घडली आहे. यात आंदेकरांच्या दोन सख्ख्या बहिणी, दोन मेव्हणे यांना आरोपी करण्यात आलं आहे. प्रॉपर्टीच्या वादातून सख्खी बहीण, दोन मेव्हणे यांनी वनराज आंदेकर यांची हत्या केली आहे, असं फिर्यादीत म्हटलं आहे. तसंच जेव्हा वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाला, तेव्हा सख्या बहिणी याला मारा... याला मारा... असा आवाज देखील देत होत्या आणि यांनीच बाहेरच्या लोकांना आणून वनराज आंदेकर यांची हत्या केली असल्याचं फिर्यादीत वडिलांनी सांगितल आहे, अशी माहिती यावेळी शर्मा यांनी दिली.
तुला पोरं बोलवून ठोकतेच -काही दिवसांपूर्वी वनराज आणि त्याच्या बहिणी तसंच मेव्हण्यांमध्ये भांडण झालं होतं. मेव्हण्यांची दुकानं अतिक्रमण करून पाडायला लावल्याचा रागातून बहिणीने वनराज यांना 'तुला पोरं बोलवून ठोकतेच' अशी धमकी दिली होती आणि त्यानंतर काल वनराज यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली. वनराज आंदेकर हे सूर्यकांत आंदेकर यांचे पुत्र होते तर आरोपी संजीवनी ही मुलगी आहे. आरोपी जयंत कोमकर हा जावई आहे. आरोपींचे १ सप्टेंबर रोजी आकाश सुरेश परदेशी याच्याशी वाद झाले होते. आरोपी तक्रार देण्याकरता समर्थ पोलीस ठाण्यात गेले असता, वनराज आंदेकर आणि शिवम आंदेकर हे देखील पोलीस ठाण्यात गेले आणि तेथे आरोपी संजीवनी आणि जयंत यांनी आकाशला मारहाण केली. हे भांडण शिवम आंदेकर यांनी सोडवलं. त्यावेळी संजीवनी हिने वनराज यांना आम्ही तुला जगू देणार नाही. तू आमच्यामध्ये आला आहेस. तू आमचं दुकान पाडलं, आता तुला पोरं बोलावून ठोकतेच.' अशी धमकी दिली होती. याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
हेही वाचा...
- पुण्यात पुन्हा गँगवॉर; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या, 3 जणांची चौकशी सुरू
- गोळ्या घातल्या तरी जिवंत राहू नये म्हणून पुन्हा कोयत्यानं वार, आंदेकर यांच्या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद