महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खळबळजनक..! भिवंडीत पाच वर्षांच्या चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत सापडला मृतदेह - BOY FOUND IN WATER TANK

भिवंडीत एका कोवळ्या मुलाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला. अन्सार मोहल्ल्यातील हा मुलगा आहे. आहद असं त्याचं नाव असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

तपास करताना पोलीस
पाहणी करताना पोलीस (बातमीदार)

By ETV Bharat Marathi Team

Published : 9 hours ago

ठाणे - भिवंडी शहरातील अन्सार मोहल्ल्यात पाच वर्षीय चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.आहिद एजाज अन्सारी वय ५ वर्ष असं मृत्यू झालेल्या दुर्दैवी चिमुरड्याचं नाव आहे. त्याचं असं झालं, 16 डिसेंबर रोजी घराजवळ खेळत असताना आहिद हरवला होता. दोन दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी दिली माहिती -पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत आहिदचे वडील एजाज अन्सारी हे पावरलूम कारखान्यात मुकादम म्हणून काम करतात. १६ डिसेंबर रोजी संध्याकाळी नमाज अदा केल्यानंतर त्यांनी आहिदला बोलवण्यासाठी बहिणीला पाठवलं, मात्र तो सापडला नाही. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीयांनी तसंच स्थानिक रहिवाशांनी त्याच शोध घेतला. शेवटी शांती नगर पोलीस ठाण्यात आहीद बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली होती. सीसीटीव्ही फुटेज तसंच सोशल मीडियावरही मुलाच्या हरवल्याची माहिती पसरवण्यात आली होती. स्थानिक नागरिक देखील पोलिसांना सहकार्य करत आहिदचा शोध घेत होते.

मृतदेहच सापडला -बुधवारी सायंकाळी त्याचा मृतदेह एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. सध्या मृतदेह शव विच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. अवघ्या पाच वर्षाचा आहिद पाण्याच्या टाकीत कसा पोहोचला, यामागील सत्य शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. ही घटना अपघात आहे की, दुसऱ्या कोणत्यातरी कृत्याचा परिणाम, यावरही तपास सुरू आहे. या घटनेमुळे आहिदच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अन्सार मोहल्ल्यात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा....

  1. गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा; तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण; नराधम अटकेत
  2. बापरे बाप! देव्हाऱ्यात निघाला भलामोठा साप, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details