महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शहराध्यक्ष पदासाठी माझ्याकडं २५ लाखांची मागणी', शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरेंचा आरोप; संजय राऊतांविरोधात पुण्यात आंदोलन - SANJAY RAUT

नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर संजय राऊतांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्या विधानाच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन करण्यात आलं.

SANJAY RAUT
संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2025, 4:06 PM IST

Updated : Feb 25, 2025, 4:45 PM IST

पुणे : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. यानंतर खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विधानाला प्रत्युत्तर देत टीका केली. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज (दि.२५) शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विधानाचं समर्थन केलं. यावेळी ते म्हणाले, "मी जेव्हा पक्षात होतो तेव्हा माझ्याकडंही तेव्हा संपर्क प्रमुखांनी शहराध्यक्ष पदासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली होती.

संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार आंदोलन :शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीनं पुण्यातील अलका चौक इथं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.

माध्यमांशी बोलताना शहराध्यक्ष नाना भानगिरे (ETV Bharat Reporter)

...तर राऊतांना शहरात फिरू देणार नाही :आंदोलनावेळी शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले, "संजय राऊत यांनी आमच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याबाबत जे विधान केलं आहे, ते फक्त नीलम गोऱ्हे यांच्याबाबत नसून तो महिलांचा अपमान आहे. त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. भविष्यात त्यांनी जर असं विधान केलं तर, त्यांना शहरात फिरू देणार नाही. त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करू."

माझ्याकडं २५ लाखांची मागणी :"मी जेव्हा शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) होते. तेव्हा संपर्क प्रमुखांनी माझ्याकडं शहराध्यक्ष पदासाठी २५ लाखांची मागणी केली होती. तेव्हा, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्क प्रमुख बाळा कदम होते. तेव्हा त्यांच्या चेल्यांनी माझ्याकडं २५ लाखांची मागणी केली होती. तेव्हा जे काही चालायचं, ते आम्हाला माहिती आहे. यावर आम्हाला जास्त बोलायला लावू नका." असं म्हणत भानगिरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं.

हेही वाचा :

  1. १६ फिक्सरची नावे रोखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन, नावे जाहीर करा-संजय राऊत
  2. दोन्ही शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा! राम शिंदे म्हणाले, "पवित्र ठिकाणावर शितोंडे उडवणं..."
  3. शिवसेनाप्रमुख असताना माझ्यासारखा कार्यकर्ता पैशांविना आमदार झाला, त्यांची आता लेना बँक - संजय शिरसाट
Last Updated : Feb 25, 2025, 4:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details