महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरळी हिट अँड रन प्रकरण : राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय - Rajesh Shah in worli hit run case - RAJESH SHAH IN WORLI HIT RUN CASE

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील राजेश शाह यांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजेश शाह यांच्यामुळं अडचणीत आलेल्या शिवसेनेनं अखेर शाह यांच्यावर कारवाई केली.

worli hit run case
worli hit run case (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 2:27 PM IST

Updated : Jul 10, 2024, 3:34 PM IST

मुंबई- वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहचे वडील राजेश शाह यांना मुलांचा कारनामा भोवला. शिवसेननं त्यांची पक्षाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी केली. राजेश शाह यांना शिवसेनच्या पदावरून मुक्त केल्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी राजेश शाह यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे आज आरोप केले होते.

उपनेतेपदावरून हकालपट्टी :राजेश शाह यांच्यावर कारवाई केल्याचं एक पत्र समोर आलंय. या पत्रात शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राजेश शाह, पालघर यांना शिवसेना उपनेता पदावरुन कार्यमुक्त करण्यात येत आहे, असं म्हटलंय. दरम्यान, मुंबईतील वरळीत रविवारी हिट अँड रनची घटना घडली होती. यात कावेरी नाखवा आणि प्रदीप नाखवा यांच्या दुचाकी गाडीला मिहीर शाह यानं मागून धडक दिली. त्यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. हा अपघात झाल्यानंतर मिहीर शाहनं घटनास्थळावरुन पळ काढला, पण कलानगरमध्ये गाडी बंद पडली होती.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून कारवाई : या घटनेची माहिती मिहीर शाहनं त्याचे वडील राजेश शाह यांना दिली. त्यानंतर ती गाडी राजेश शाह यांनी अज्ञातस्थळी लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि गाडीवरील पक्षाचं चिन्ह, नंबरप्लेट बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेवरुन विरोधकांकडून शिंदे गटावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर वरळीच्या हिट अँड रन अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शाह यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेत राजेश शहा यांच्याकडं शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी होती. त्यांचा मुलगा मिहीर शाहनं वरळीत एका महिलेला कारनं चिरडल्यानंतर पक्षानं त्यांच्यावर कारवाई केली आहे.

"होय, अपघाताच्या वेळी मी गाडी चालवत होतो";वरळी हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी आरोपी मिहिर शाहच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. मिहीरला अटक केल्यानंतर रात्री उशिरा त्याची आई, दोन बहिणी आणि एका मित्राचे जबाब गुन्हे शाखा 3 मध्ये नोंदवण्यात आले. अपघाताच्या वेळी तो गाडी चालवत होता, अशी कबुली मिहिर शाहनं दिलीय. मिहीरला अटक केल्यानंतर प्राथमिक तपासात त्यानं गाडी चालवत असल्याचं मान्य केलं. यामध्ये मिहीरच्या बहिणीनं पोलिसांना सांगितलं की, या घटनेनंतर आपण घाबरलो. आपल्यावर हल्ला होईल, या भीतीनं घरातून बाहेर पडलो. मिहीर आणि त्याचं कुटुंब दोन कारमधून शहापूरला गेलं. एका पंजाबी व्यक्तीनं त्यांची शहापूर येथे राहण्याची व्यवस्था केली. या पंजाबी व्यक्तीचे शाह कुटुंबाशी जुने संबंध असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

कोण आहेत राजेश शाह : शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पालघर जिल्हाप्रमुख असलेल्या राजेश शाहांची पक्षातून हकालपट्टी केली होती. राजेश शाह यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटाकडून कारवाई करण्यात आली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालेल्या या कारवाईनंतर राजेश शाह यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांची पालघर जिल्ह्याचे उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसंच राजेश शाह यांनी नुकताच झालेल्या कोकण पदवीधरचा प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीतील हेमंत सवरा यांच्या प्रचारात देखील ते सक्रिय होते.

'हे' वाचलंत का :

  1. अपघातापूर्वी मिहिर शाह गेलेल्या बारवर बीएमसीची कारवाई, अनधिकृत बांधकाम पाडलं - Worli Hit And Run Case
  2. वरळी हिट अँड रन प्रकरण : मिहिर शाह आणि मुख्यमंत्र्यांचे व्यावसायिक संबंध, संजय राऊतांचा गंभीर आरोप - worli hit and run case
  3. "आरोपी मिहीर शाहला फासावर लटकवा"; नाखवा कुटुंबाची मागणी - Worli Hit And Run Case
Last Updated : Jul 10, 2024, 3:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details