साई मंदिरात उन्हापासून भाविकांचं होणार संरक्षण शिर्डी (अहमदनगर) (Shirdi Saibaba Sansthan) :साईंचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून साई भक्त शिर्डीत येतात. या वर्षी उन्हाचा कडाका जास्तच राहील असं सांगण्यात आलं आहे. तर आता उन्हाचा चटका जाणवू लागल्यानं, शिर्डीत साईबाबा (Shirdi Saibaba) संस्थाननं भाविकांना उन्हापासून बचावासाठी उपाय योजना करण्यास सुरूवात केलीय. शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात सावलीसाठी मंडप उभारण्यात आला आहे. तसंच भाविकांच्या पायाला चटके बसू नये यासाठी फरशीवर कारपेट टाकण्यात आलं आहे.
साई भक्तांना उन्हापासून दिलासा : कडक उन्हाळा सर्वांनाच नको-नको वाटतो. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मंदिर परिसरात संस्थानानं विविध उपाय योजना केल्या आहेत. भाविकांना मंदिरात जाताना पादत्राणे बाहेर काढून जावं लागत असल्यानं मंदिर परिसरात साई संस्थानच्या वतीनं मंडप उभारण्यात आले आहेत. तसंच पायाला चटके बसू नये म्हणून कारपेट टाकण्यात आलं आहे. त्यामुळं भक्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
भाविकांचे उन्हापासून संरक्षण : यावर्षीचा उन्हाळा प्रत्येक वर्षापेक्षा जास्तच असणार आहे. मात्र, तरीही सुट्यांच्या निमित्तानं भाविक, पर्यटक बाहेर निघतात. शिर्डीला येणाऱ्या भाविकांची संख्या काहीशी रोडावली असली तरी, जे भाविक शिर्डीला येतात त्यांंना उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी साईबाबा संस्थाननं काही उपाय योजना केल्या आहेत. उन्हापासून बचावासाठी साई मंदिर परिसरात पांढऱ्या रंगाच्या कापडाचा मंडप उभारण्यात आला आहे. तसंच फरशीवर कारपेट टाकण्यात आलं आहे. त्यामुळं साई भक्तांचा उन्हापासून बचाव होणार आहे. त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी दोन ते तीन तास रांगेत उभे राहावं लागतं, त्यामुळं साई भक्तांना तापमान वाढीचा सामना करावा लागतो. म्हणून संस्थानानं हा निर्णय घेतलाय.
हेही वाचा -
- महाशिवरात्री 2024 : साई बाबांच्या प्रसादालयात 15 हजार किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद
- 'लग्न कल्लोळ' चित्रपटाच्या यशासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधवचं साईंना साकडे, पाहा व्हिडिओ
- शिर्डीत साई परिक्रमा सोहळा; हजारो साईभक्तांच्या जयघोषानं दुमदुमली साईनगरी