महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

झळा वाढल्या...गरिबांचा फ्रीज बाजारात, कमी किंमतीत थंडगार पाणी अन् चवही न्यारी - Summer Matka Business - SUMMER MATKA BUSINESS

Summer Matka Business : उन्हाची चाहूल लागताच बाजारपेठेत मातीचे माठ दाखल होतात. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही गरिबांचा फ्रीज असलेला माठ बाजारपेठेत दाखल झाला आहे.

Shirdi Clay Pot Business more demand for Clay Pots in summer customers rush for shopping
झळा वाढल्या...गरिबांचा फ्रीज बाजारात, कमी किंमतीत थंडगार पाणी अन् चवही न्यारी

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 10:57 PM IST

हिराबाई रसाळ , माठ व्यावसायिक

शिर्डी (अहमदनगर) Summer Matka Business :यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्यानं गरिबांचं फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांना बाजारात मागणीही तेवढीच वाढली आहे. यामुळं माठ विक्री व्यावसायिकांना यंदाच्या वर्षी तरी काहीसा दिलासा मिळणार असल्याचं चित्र सध्या राहाता तालुक्यातील आस्तगावमध्ये पाहायला मिळत आहे.

मातीसह भुशाच्या किंमतीत वाढ : राहाता तालुक्यातील आस्तगाव येथील कुंभार व्यावसायिकांनी वर्षभर केलेल्या मेहनतीनंतर बनविण्यात आलेल्या माठांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यंदाच्या वर्षी मार्च महिन्याचा सुरुवातीलाच उन्हाचे चटके जाणवू लागल्यानं मातीच्या माठांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसंच माठ बनवण्यासाठी लागणाऱ्या मातीसह भुशाच्या किंमतीतही यंदा वाढ झाली आहे.


वेगवेगळ्या प्रकारच्या माठांना पसंती : सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात नळ असलेल्या माठांना ग्राहक पसंती देत असल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्रात प्रामुख्यानं काळे माठ बनविले जातात. मात्र, ग्राहक राजस्थान, गुजरातमधील लाल आणि नक्षी असलेल्या माठांनाही पसंती देत असल्यानं पारंपरिक माठांसह विविध प्रकारचे माठही बाजारात बघायला मिळताय.

माठातील पाण्यानंच तहान भागते : यासंदर्भात माठ व्यावसायिक हिराबाई रसाळ यांच्याशी संवाद साधण्यात आला असता त्या म्हणाल्या की, "कडाक्याचा उन्हाळा सुरू झाल्यानंतर लोक मातीच्या माठातील गारगार पाणी पिण्याला पसंती देतात. माठातील पाणी आरोग्यासाठीही चांगलं असते. मात्र, सध्या जारच्या पाण्याला काही नागरिक पसंती देत असल्याचं पाहायला मिळतंय. जारचं पाणी आता वाडी वस्तीवर, शहरात घर पोहोच मिळतंय. जारच्या पाण्याचा काही प्रमाणात फटका माठ विक्रीत्यांना बसलाय. मात्र, तुम्ही फ्रीज किंवा जारचं पाणी कितीही पिलं तरी तुमची तहान भागणार नाही. शेवटी माठातील गारगार पाणी पिल्यानंच तहान भागते."

हेही वाचा -

  1. Shirdi Saibaba Sansthan : शिर्डी साई मंदिरात उन्हापासून भाविकांचं होणार संरक्षण; साईबाबा संस्थानच्या वतीनं करण्यात 'ही' सोय
  2. शिर्डीत या आणि सव्वा रुपयात लग्न लावा, २ मे रोजी पार पडणार सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा
  3. महाशिवरात्री 2024 : साई बाबांच्या प्रसादालयात 15 हजार किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद

ABOUT THE AUTHOR

...view details