मुंबई Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan :महाराष्ट्रभर गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेला लालबाग परिसर सध्या गणेशोत्सवाच्या जयकारानं फुलून गेलाय. लालबाग परिसरात अनेक गणेश मंडळाच्या बाप्पांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून राज्यभरातून गणेश भक्त दर्शनासाठी येत असतात. तर सध्या 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी राजकारणी, सेलिब्रिटी, उद्योजक आणि दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. 'नवसाला पावणारा' गणपती अशा प्रकारची ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून अनेक दिग्गज हजेरी लावत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (9 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली नात रेवती सुळे आणि जावई सदानंद सुळे यांच्यासह 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेतलं.
शरद पवारांनी नात, जावयासह घेतलं 'लालबागच्या राजा'चं दर्शन - Sharad Pawar Lalbaugcha Raja - SHARAD PAWAR LALBAUGCHA RAJA
Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (9 सप्टेंबर) 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची नात रेवती सुळे आणि जावई सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते.
शरद पवारांनी घेतलं 'लालबागच्या राजा'चं दर्शन (ETV Bharat Reporter)
Published : Sep 9, 2024, 1:18 PM IST
हेही वाचा -
- 'लालबागच्या राजा'ची पहिल्या दिवशीची दानपेटी उघडली; पहिल्याच दिवशी किती दान? - Lalbaugcha Raja Donation
- 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात बाप्पाचं ठिकठिकाणी आगमन; पाहा व्हिडिओ - Ganesh Chaturthi 2024
- "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 'लालबागचा राजा'..."; आशिष शेलारांचा संजय राऊतांवर पलटवार - Ashish Shelar on Sanjay Raut