महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवारांची तब्येत बिघडली, चार दिवस विश्रांतीचा सल्ला - SHARAD PAWAR HEALTH

शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळं शरद पवारांनी चार दिवसांचे सर्व दौरे रद्द केले आहेत.

SHARAD PAWAR HEALTH
शरद पवार (संग्रहित छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2025, 3:00 PM IST

Updated : Jan 25, 2025, 4:15 PM IST

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना डॉक्टरांनी चार दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तब्येत बिघडल्यामुळे शरद पवारांनी आपले सर्व दौरे रद्द केले आहेत.

पवारांचे चार दिवसांचे दौरे रद्द :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दौरे करताना पाहायला मिळत आहेत. मात्र, अचानक तब्येत बिघडल्यानं पुढील चार दिवसांचे त्यांचे दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून देण्यात आली आहे.

कार्यक्रमांमध्ये बोलताना शरद पवारांना अडचण :गेले दोन दिवस शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान आयोजित कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांना बोलताना अडचण होत होती. त्यानंतर आता शरद पवार यांच्या तब्येतीबाबत नवी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांचं स्वास्थ्य ठीक नसल्यानं पुढील चार दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. खोकला असल्यानं शरद पवार यांना बोलण्यास त्रास होत आहे. म्हणून त्यांना कार्यक्रमात भाषण करण्यास अडचण होत होती.

श्रीकांत शिरोळे यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात होणाऱ्या ध्वजवंदन समारोहाला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळं ७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांच्या हस्ते ध्वजवंंदन होणार आहे, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.

Last Updated : Jan 25, 2025, 4:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details