महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद मोहोळ खून प्रकरण; मुख्य आरोपीनं जिथं पसरवली दहशत, तिथंच काढली पोलिसांनी धिंड - शरद मोहोळ खून प्रकरण

Sharad Mohol Murder Case : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी गुंड विठ्ठल शेलार याला अटक केली आहे. मात्र विठ्ठल शेलार याची पुणे पोलिसांनी त्याच्याच पिरसरात धिंड काढलीय.

Sharad Mohol Murder Case
Sharad Mohol Murder Case

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 9:30 AM IST

Updated : Jan 20, 2024, 5:10 PM IST

गुंड विठ्ठल शेलारची पुणे पोलिसांनी काढली धिंड

पुणे Sharad Mohol Murder Case : गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गुंड विठ्ठल शेलारची पोलिसांनी त्याच्याच भागात धिंड काढलीय. त्याची ही धिंड गुन्हेगारीतील 'मुळशी पॅटर्न'ला पुणे पोलिसांचा जबर हिसका म्हणावं लागणार आहे.

आतापर्यंत 14 जण ताब्यात : काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात गुंड विठ्ठल शेलारसह सहा जणांना नवी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं.आतापर्यंत शरद मोहोळ खून प्रकरणात 14 जणांना अटक करण्यात आलीय. 5 जानेवारी रोजी पुण्यातील कोथरुड येथील सुतारदारा येथे गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर त्याचे साथीदार मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनी गोळ्या झाडून खून केला होता. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पाठलाग करुन अटक केली होती.

त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं : पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरुड परिसरात भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता. शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी जात असताना त्याच्याच साथिदारांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली होती. यात तो गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळला कोथरुडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करत आतापर्यंत 14 जणांना अटक केलीय.

पुण्याची प्रतिमा मलिन : पुणे शहराला विद्येचं माहेरघर तसंच एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. पण त्याच पुण्यात गेल्या काही वर्षांपासून जी गुन्हेगारी उभी राहिली आणि त्यातून रक्तपाताचा अध्याय लिहिला गेला, तो पाहता परिस्थिती नियंत्रणात नसल्याचं दिसतंय. पुण्यात खुलेआम सुरु असलेलं टोळीयुद्ध, कोयता गँग, महिला अत्याचार, खुनांच्या घटनांमुळं पुण्याची प्रतिमा पार मलीन झाल्याची चर्चा नागरिक करत आहेत.

हेही वाचा :

  1. शरद मोहोळ खून प्रकरणी गुंड विठ्ठल शेलारसह 6 जणांना अटक, गुन्हे शाखेची मोठी कारवाई
  2. शरद मोहोळच्या हत्येचे धागेदोरे साताऱ्यापर्यंत, पिस्तूल पुरवणाऱ्या कराडच्या तरूणास अटक
Last Updated : Jan 20, 2024, 5:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details