मुंबईGhatkopar Hoarding Case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणात गुन्हे शाखेने दुसरी अटक केली आहे. भावेश भिंडेनंतर (Bhavesh Bhinde) आता होर्डिंगच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरला अटक करण्यात आलीय. याप्रकरणात एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या भावेश भिंडेला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मनोज संघूला अटक : मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात गुन्हे शाखेची आज मोठी कारवाई करत आणखी एकाला अटक केलीय. मनोज संघु नावाच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरला गुन्हे शाखेने अटक केलीय. पालिकेने मान्यता दिलेल्या या स्ट्रक्चरल इंजिनिअरविरोधात अटकेची कारवाई करण्यात आलीय. घाटकोपर येथील दुर्घटना ग्रस्त होर्डिंगला याने स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिलं होतं.