साताराson raped her mother : आई तसंच मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेनं सातारा जिल्हा हादरून गेलाय. जावळी तालुक्यातील एका गावात व्यसनी मुलानं आपल्या आईवरच अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठी सुनावली आहे.
जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार :जावळी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या आरोपीनं आपल्या आईवर बलात्कार केला. आई किचनमध्ये काम करत असताना आरोपीनं आक्षेपार्ह कृत्य केलं. त्यानंतर त्यानं आईवर अतिप्रसंग केला. त्यामुळं सर्वत संताप व्यक्त होत आहे. तसंच कोणाला सांगितल्यास आरोपीनं तिला जीवे मारण्याची धमकीही दिली, असा दावा पीडितेनं केलाय. या प्रकरणानंतर पीडितेला मोठा मानसिक धक्का बसला. अखेर पीडितेनं स्वत:ला सावरून पोलीस ठाण्यात धाव घेतली. नराधम मुलाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नराधम मुलाला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
- नराधमाच्या कृत्यानं तालुक्यात खळबळ :पोटच्या मुलानं जन्मदात्रीवर केलेल्या अत्याचारानं जावळी तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. सामाजिक आणि सांप्रदायाची पार्श्वभूमी असणाऱ्या जावळी तालुक्याची मान शरमेनं खाली गेली आहे. या घटनेमुळं सर्व स्तरात संताप आणि चीड व्यक्त होत आहे.