महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. अजय तावरेला भर चौकात फाशी द्या; आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी - Pune Hit and Run Accident

Ravindra Dhangekar : पुण्यातील ससून रुग्णालयाचा तत्कालीन अधीक्षक डॉ अजय तावरे हा चुकीचं कामं करत असून पुणे अपघात प्रकरणात संशयित आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉ अजय तावरेला भर चौकात फाशी द्या, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलीय.

आमदार रवींद्र धंगेकर
आमदार रवींद्र धंगेकर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 31, 2024, 10:29 PM IST

कोल्हापूर Ravindra Dhangekar : पुण्यातील ससून रुग्णालयाचा तत्कालीन अधीक्षक डॉ अजय तावरे हा चुकीचं कामं करतोय. हे रुग्णालय प्रशासनापासून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांपर्यंत सर्वांना माहीत होतं. मात्र प्रशासन ही तावरेच्या पाठीमागं उभं राहिलं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. यात सुद्धा शंका आहे, डॉ अजय तावरेला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं, माझ्यावर हक्क भंग करणाऱ्याच्या मतदारसंघात जाऊन मी तिथं स्पष्टीकरण द्यायला तयार आहे, पुण्यातील अपघात प्रकरणात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचीही चूक आहे. पुण्यातील पर संस्कृती संपवल्यास मंत्री मुश्रीफ यांची पायावर डोकं ठेवून माफी मागील. मात्र, संशयित आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉ अजय तावरेला भर चौकात फाशी द्या, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलीय. कोल्हापुरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आमदार रवींद्र धंगेकर (ETV Bharat Reporter)

पुण्यात बिल्डर लोकांचं राज सुरु : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या बिल्डरांचं राज्य सुरु आहे. पोलीस सुपाऱ्या घेऊन कामं करतात, राज्यातून अनेक तरुण आणि तरुण पुण्यात आपलं उज्वल भविष्य घडवण्यासाठी येत आहेत, नोकरवर्ग येतोय, मात्र पांढरपेशी वर्गाकडून पुण्यात पब संस्कृती आली, उडता पंजाब सारखं उडता पुणे अशी संस्कृती पुण्यात तयार झाली. पोलिसांनी पैसे खाऊन दोन-दोन फिर्यादी लिहिल्या, एका FIR मधून त्यांना सोडून देण्यात आलं. तपास अधिकाऱ्यांनी तपासाची दिशा योग्य पद्धतीनं नेलीय. मात्र, सरकारचा दबाव येऊ शकतो, ससूनवर जे आरोप केले त्यामुळं मुश्रीफ यांना राग आला. मी त्यांचे पाय पडून माफी मागतो. मात्र, पब संस्कृती संपली पाहिजे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात कामं करताना मला कोणाचीही भीती वाटतं नाही. मला कोणीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरणार नाही, माझ्यावर कारवाई केली तर प्रत्येक पुणेकर रस्त्यावर येईल, या प्रकरणात भाजपा मला वैयक्तिक जीवनात त्रास देत असल्याचा आरोपही आमदार धंगेकर यांनी यावेळी केला.

4 जूननंतर मी विधानसभेत नसेल : पुणे अपघात प्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. मात्र, या चौकशी समितीतील सदस्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. यासाठी हे प्रकरण येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्याचा आमच्या विरोधी पक्षाचा मानस आहे. मात्र 4 जूननंतर मी कदाचित विधानसभेत नसेल. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्ष हा प्रश्न नक्कीच राज्याच्या सर्वोच्च सभागृहात उठवतील असा विश्वास व्यक्त करत आमदार रवींद्र धंगेकर यांनी लोकसभा विजयाचा विश्वासही व्यक्त केलाय.



हेही वाचा :

  1. ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात अखेर ससूनचे डीन सक्तीच्या रजेवर, रक्ताच्या नमुन्यात फेरफार करणारे डॉ. तावरे, डॉ. हाळनोर निलंबित - Pune Porsche Accident Case
  2. पुणे हिट अँड रन प्रकरण: "आमदारकी कशी आणि कुठे वापरायची हे कळतं का?'...; अजित दादांनी 'त्या' आमदाराला झापलं... - Pune Hit And Run Case

ABOUT THE AUTHOR

...view details