महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी - DHANANJAY MUNDE RESIGN

आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

DHANANJAY MUNDE RESIGN
माध्यमांशी बोलताना आमदार संदीप क्षीरसागर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2025, 4:37 PM IST

Updated : Jan 26, 2025, 6:18 PM IST

बीड :राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली. यादरम्यान त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

CDR तपासण्याची मागणी : शमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे सापडेल अस मल वाटत नाही. त्या भागातील एक इतिहास आहे. जर, तो सापडायचा असता तर पोलिसांनी त्याला कधीच पकडलं असतं. त्यामुळे मला वाटत नाही तो आता सापडेल. मी पहिल्यापासून CDR तपासण्याची मागणी करत आहे. या प्रकरणाबाबत काही ना काही सीसीटीव्ही फुटेज मिळत आहे त्याच्या माध्यामातून साखळी जुळत आहे. माध्यमांनी ते दाखवलं म्हणून ज्यांच्यावर अन्याय झाला ते पुढे येत आहे. आणखी बरेच जण पुढं येतील," असं आमदार संदीप क्षीरसागर म्हणले.

माध्यमाशी बोलताना आमदार संदीप क्षीरसागर (ETV Bharat Reporter)

प्रशासनाला मोकळा श्वास दिला पाहिजे : "आमदार सुरेश धस आणि मी यावर पोलीस अधीक्षकांशी बोलणार आहे. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर देखील लोक रस्त्यावर आलेत. याचा अर्थ लोकांमध्ये रोष आहे. प्रशासनाला मोकळा श्वास दिला पाहिजे. त्यामुळं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि सरकारनं तो स्वीकारला पाहिजे. सरेंडर होण्यापासून व्हीआयपी ट्रिटमेंट झाली ती केवळ मंत्रिपद असल्यामुळंच. वाल्मिक कराडला पुण्यात कोणी रुग्णालयात दाखल केलं? त्या काळात कोण त्यांना भेटायला गेलं? याचा संपूर्ण तपास झाला पाहिजे," अशी भूमिका आमदार संदीप क्षीरसागर यांनी मांडली.

हेही वाचा :

  1. केज न्यायालयातील वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे, काय कारण?
  2. आरोपी वाल्मिक कराडला मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात केलं दाखल; काय आहे नेमकं प्रकरण ?
  3. वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, काय म्हणाले सरकारी वकील?
Last Updated : Jan 26, 2025, 6:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details