संजय राऊत यांची प्रतिक्रिया शिर्डीSanjay Raut :देशात विरोधकांना फोडण्याचं काम भाजपा सरकार करत आहेत. गंभीर आरोप असलेले असेच नेते भाजपात सामील झाल्याचा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांना लगावला आहे.कोण दु:खी आहे, कोण आनंदी आहे हे तपासण्यासाठी तुमच्या काखेत मशीन ठेवणार का? असा सवाल राऊत यांनी केलाय. तसंच आगामी निवडणुकीत भाजपाला 200 जागाही निवडणून आणता येणार नाही, असा टोलादेखील त्यांनी भाजपाला लगावला आहे.
महाविकास आघाडी राज्यात दौरा करणार :महाविकास आघाडी राज्यात दौरा करणार असल्याचं देखील खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. महाविकास आघाडीही संयुक्त दौरा करणार आहे. सर्व प्रमुख पक्ष या दौऱ्यावर असतील. वंचितचादेखील त्यात समावेश असणार आहे. या दौऱ्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपानं लोकशाहीची हत्या केलीय. रावणानं सीतेचं अपहरण केलं, अगदी तशीच भूमिका भाजपा बजावत असल्याची घणाघाती टीका राऊतांनी केली आहे.
"आमचे नेते कितीही फोडले, तरी जनता आमच्यासोबत आहे. शिवसेना महाराष्ट्राला समर्पित आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात 30 जागांचं बहुमत असेल. तसंच लोकसभेच्या आणखी 10 जागा आम्हाला मिळतील. शिर्डी मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केलेला नाहीय. ज्यांनी दावा केला ते आता भाजपामध्ये सहभागी झाले".- संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
मोदी-शाह अज्ञातवासात जाणार : शेतकरी नाराज झाल्यानं मोदी तसंच शाह अज्ञातवासात जातील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणं म्हणजे भाजपाला चिथावणी वाटतं का?, असा सवालही राऊतांनी केलाय. तसंच एस.एस स्वामीनाथन यांना सरकारनं भारतरत्न पुरस्कार जाहीर केलाय. मात्र, त्यांनी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी भाजपा सरकार करत नसल्याचा आरोप त्यांनी संजय राऊतांनी केलाय.
- अशोक चव्हाण चांगले गृहस्थ : अशोक चव्हाण चांगले गृहस्थ होते. मात्र, त्यांनी भीतीपोटी भाजापमध्ये प्रवेश केल्याचा दावा राऊत यांनी केलाय. भाजपात जाऊन चव्हाण यांनी मोठी चूक केल्याचं देखील राऊत म्हणाले. आमचे 40 आमदारही शिंदे गटात गेले. अजित पवारांचं सर्व काही बनावट आहे. तसंच माझा दौरा म्हणजे लोकसभेची तयारी नसल्याचंदेखील राऊतांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का :
- भाजपामधील इनकमिंगमुळं निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय?
- गोळीबार प्रकरण : आमदार गायकवाडांसह पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- अशोक चव्हाणांमुळं नारायण राणेंची पुन्हा राजकीय गोची?