मुंबई:सिंचन घोटाळ्याप्रकरणी तपास झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंग नेते, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर आरोप केल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, " आर. आर. पाटील अत्यंत प्रामाणिक आणि कर्तबगार व्यक्ती होते. त्यांनी गृहमंत्री म्हणून कधीच चुकीचं काम केलं असेल असं आम्हाला वाटत नाही. त्यांचे केस फार लहान असल्याने ते केसाने गळा कापू शकत नाहीत," असा टोलाही राऊत यांनी अजित पवारांना लगावला आहे.
केस लहान आल्यामुळे...या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, " माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्यावर सही केल्याचे अजित पवारांनी जनतेला दाखवले. तसेच फडणवीस यांनी त्यांना सही केल्याचे दाखवले. याकरता आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. कारण या दोघांनी संविधानाप्रमाणे गोपनीयतेची शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर अशी माहिती सार्वजनिक करणे, हा गोपनीयतेचा भंग असून फार मोठा गुन्हा आहे. या कारणानं राज्यपालांनी या दोघांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश दिले पाहिजेत."