मुंबई Lok Sabha Election Results 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमध्ये पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते. हाच देशाचा कल आहे. उत्तरप्रदेशचा कल हा केवळ त्या राज्याचा कल नसून, संपूर्ण देशाचा कल आहे, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपासह मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार टीका केली. काँग्रेस पक्षाला देशभरात १५० जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत कँग्रेसला ५० जागा देखील मिळाल्या नव्हत्या. कँग्रेस १५० जागांपर्यंत पोहचणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ होण निश्चित आहे, असंही राऊत म्हणाले.
मोदींचा निरोप समारंभ होणार : उत्तर प्रदेशमधील कल भाजपा व मोदींविरोधात आहेत. पंतप्रधान मोदी हे सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते हेच भाजपाचं अपयश आहे. त्यामुळं पंतप्रधान मोदी यांचा निरोप समारंभ जवळ आल्याचंही संजय राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदींपेक्षा राहुल गांधी लोकप्रिय : 'इंडिया' आघाडीला मिळत असलेल्या यशाचे श्रेय राहुल गांधींना जात असल्याचे राऊत म्हणाले. राहुल गांधीनी वादळ निर्माण केले. त्यांच्या साथीने इंडिया आघाडीतील देशभरातील विविध नेत्यांनी परिश्रम केले. त्यामुळे हा विजय मिळत असल्याचे राऊत म्हणाले. राहुल गांधी देशाचे नेते आहेत व ते नरेंद्र मोदींपेक्षा लोकप्रिय आहेत, असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश ; सुप्रिया सुळे दीड लाख मताधिक्याने जिंकतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे राहील व देशभरात इंडिया आघाडीला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील. या देशात सरकार कोण बनवतोय हे लवकरच स्पष्ट होईल, असंजी संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा -
- तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात 'या' सुविधा!
- महाराष्ट्रासह 'या' चार राज्यांतील निकालावरून ठरणार राजकीय समीकरणे
- निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारात भूकंप, शेअर बाजार निर्देशांकात 1300 अंशाची घसरण