मुंबई-अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करून पोलिसांची दमछाक करणाऱ्या आरोपीला (Saif Ali Khan attack case) अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारअटक करण्यात आलेला आरोपी हा रेस्टॉरंटमध्ये वेटर असून त्याचं विजय दास असं नाव आहे. आरोपीनं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईबाबात मुंबई पोलिसांकडून आज सकाळी ९ वाजता डीसीपी झोन ९ कार्यालयात पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यात अटकेच्या कारवाईची माहिती दिली जाणार आहे.
पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीनं त्याचा शोध घेतला. मुंबईच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोहम्मद सज्जद उर्फ विजय दास याचं टॉवर लोकेशन वडवली पोलीस स्टेशन हद्दीत हिरानंदानी इस्टेटमध्ये मिळालं होतं. पोलिसांनी शोध मोहिमेत आरोपीला अटक केली आहे. विजय दास काही वर्षांपूर्वी हिरानंदानी परिसरात मजूर म्हणून काम करत होता. त्याला या परिसराची चांगली माहिती होती. आरोपीला हिरानंदानी कामगार छावणीजवळ अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या परिसरात आरोपी दोन दिवस लपून राहिला होता. हा संपूर्ण परिसर ठाण्यातल्या अति महत्त्वाच्या अशा हिरानंदानी स्टेटमधील लेबर कॅम्पचा परिसर आहे. या ठिकाणी सहजासहजी जात येत नाही. त्यामुळे या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेच्या त्रुटी समोर आल्या आहेत. विजय दासवर अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी हल्ला केल्याचा आरोप आहे. अटक केल्यानंतर त्याला झोन ६ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून चौकशी केली जात आहे.
घटनास्थळावरून घेतलेली माहिती (Source- ETV Bharat Reporter) पोलिसांची नेमली आहेत 35 पथके-अभिनेता सैफवर हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांसह सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. मुंबई पोलिसांची 35 पथके तपास करण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासत दोन संशयितांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी अभिनेत्याच्या घरी काम करणाऱ्या दोन लोकांना ताब्यात घेऊन त्यांचीदेखील चौकशी केली. मात्र, पोलिसांना तपासात ठोस माहिती मिळाली नव्हती. आरोपीला ठाण्यातून अटक केल्यानंतर पोलिसांकडून पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार आहे.
आरोपीला ठाण्यातून अटक (Source- ETV Bharat) अभिनेता सैफला 21 जानेवारीला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता-अभिनेता सैफ अली खानच्या घुसलेल्या आरोपीनं एक कोटी रुपयाची मागणी करत अभिनेत्यावर चाकूनं वार केले होते. जखमी झालेल्या सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले. अभिनेता सैफ अली खानची प्रकृती सुधारत आहे. त्याला आयसीयूमध्ये जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सैफला रुग्णालयातून २१ जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया झाल्यानं अभिनेता सैफला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.
हेही वाचा-
- अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील संशयित छत्तीसगडमध्ये ताब्यात, मुंबई पोलीस घेणार ताबा
- मुंबई हे एक महत्त्वाचं शहर; प्रत्येकाने बोलताना जबाबदारीनं बोलावं; मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य
- सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरण, पोलीस आणि गुन्हे शाखेच्या तपासात आतापर्यंत काय समोर आलं?