मुंबई Uddhav Thackeray targeted Mahayuti :दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सद्भावना दिवस मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधलाय.
काँग्रेस पक्ष कधीच विरोधकांशी सूडभावनेनं वागला नाही : "आम्ही विरोधात असतानाही जे पटलं नाही, तेच बोललो. आम्ही आजही सद्भावनेच्या बाजूनं आहोत. यापुढं देखील आम्ही सद्भावनेच्या बाजूनं बोलणार आहोत. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस तसंच काँग्रेस पक्ष अधिक काळ सत्तेत होते. पण, काँग्रेस आमच्याशी कधीच सूडभावनेनं वागली नाही. यालाच राजकारण म्हणतात. मात्र, आत्ताचे सत्ताधारी विरोधकांशी सुडभावनेनं वागत असल्याचा गंभीर आरोप आहेत", असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय.
आज मी काँग्रेसच्या कार्यक्रमाला हजर आहे की नाही हे पाहण्यासाठीही थोडा चिमटा काढून पाहिला. मग नंतर मी काँग्रेस गमछासुद्धा घातला. त्याचा आदर केला. आता उद्या नक्की फोटो येईल. तो फोटो काढण्यासाठीच गमछा घातला. कारण विरोधकांकडं त्यांचं कर्तृत्व दाखवण्यासाठी काहीही नाही. मग आम्ही काय करतो, ते भाजपा मोठं करून दाखवतो. तुम्हाला काय दाखवायचे ते दाखवा. यावेळी थोडक्यात वाचलात, नाहीतर त्यांना देशानं बरोबर उजवा हात दाखवला होता.' - उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री
विरोधकांवर ईडी सीबीआयचा वापर झाला नाही : यावेळी उद्धव ठाकरेंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. "राज्यातील तत्कालीन युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी तसंच उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, दिवंगत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते. काँग्रेसकडून सरकारच्या विरोधात आंदोलनं केली जाताना तुम्ही लाठीमार करू नका. काँग्रेसचे कार्यकर्ते असले तरी ते आपलेच लोक आहेत, असे बाळासाहेब म्हणाले होते. मानवतेचा हा भाग आता लोप पावत चालला आहे. त्यावेळी शिवसेनेनं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. पण त्यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या घरी ईडी किंवा सीबीआय कधी आल्याचं मला आठवत नाही", असा टोला त्यांनी भाजपला लगावाला.
काँग्रेसनं कधीस सुड भावनेनं काम केलं नाहीय : "आम्ही राजीव गांधींच्या विरोधात असतानाही त्यांनी कधीही सूडाच्या भावनेनं आमच्याविरुद्ध कृती केली नाही. तुम्हाला सत्तेवर आणणाऱ्या शिवसेनेला तुम्ही संकटकाळात संपविण्याकरता निघाले. तिच शिवसेना तुमची मित्र कशी बनू शकते", असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. "महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारण पुसून टाकण्याचं काम सध्या सुरू आहे. दिवंगत राजीव गांधींसारख्या सुसंस्कृत माणसानं देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केलं. परंतु लसीकरण प्रमाणपत्रावर राजीव गांधींचा फोटो नाही. त्यांनी कधीही कोणत्याही समस्येकडं पाठ फिरवली नाही. मणिपूर जळत असेल, तर ते पेटू द्या, असं कधी झालं नाही. राजकारणातला दिलदारपणा संपला असं, त्यावेळी माजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. मात्र आत्ताचे सत्ताधारी तो मरतो तर मरूदे, असं म्हणणारे आहेत," अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.
त्यांच्यात कधीच मी पणा नव्हता : "केंद्रात तत्कालीन काँग्रेसचे सरकार असतानाही राजीव गांधींनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. पण आज मला सर्व काही हवं आहे. सोसायटीचा चेअरमन तर हवाच आहे. पण बागेचा चेअरमनही हवा आहे. राजीव गांधी यांच्यात कधीच मीपणा नव्हता. त्यांनी पंचायतराज ओळखून लोकशाहीत अधिकारांची विभागणी केली होती. आज सर्व काही एक राष्ट्र, एक निवडणूक आहे. मग तुमच्या राष्ट्रात महाराष्ट्राचा समावेश का नाही?, असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. बदलापूरमधील घटना अत्यंत विकृत आहे. त्याकडं दुर्लक्ष केलं जाणार नाहीय. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उलटं टांगून फाशी द्यायला हवी", असे ते म्हणाले.
सत्ता जिहादविरोधात एकत्र आलोय : "मी काँग्रेससोबत आलो, तर हिंदुत्व सोडलं म्हणत आहात. तुम्ही देशाचे पंतप्रधान असूनदेखील चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्या मांडीला मांडी लाऊन बसला आहात. संघमुक्त भारत म्हणणारे नितीशकुमार हे हिंदुत्ववादी आहेत का?, असा थेट सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. भाजपा सध्या सत्तेसाठी धावत आहे. भाजपाला सत्ता हवी असल्यामुळं भ्रष्ट, देशद्रोही चालताय. त्यामुळं भाजपानं देशात सत्ता जिहाद सुरू केल्याचं ठाकरे म्हणाले. या सत्ता जिहादविरोधात आमची एकजूट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मी हिंदुत्व सोडणार नाही. तसंच इतर धर्मांवर अन्याय करणं हे माझं हिंदुत्व नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा आम्हाला साफ करायचा आहे," अशा इशारा ठाकरेंनी भाजपाला दिला.
राजीव गांधी, मुंबईत पदयात्रा काढणारे पहिले नेते : यावेळी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं की, "आज भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एकत्र आलो आहोत. राजीव गांधी हे मुंबईत पहिली पदयात्रा काढणारे नेते म्हणून ओळखले जातात. राज्यात एकीकडंलाडक्या बहिणीवर अत्याचार होत आहेत. तर दुसरीकडं बदलापूरमध्ये दोन मुलींवर अत्याचारझाल्यानं नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळं या सर्वांची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घ्यावी लागेल."
हे वाचलंत का :
- "यांच्याकडे आपण लक्ष देत नाही...", शिंदेंच्या आमदाराला अजित पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर - Ajit Pawar On Mahendra Thorve
- "...तर मी राजकारणातून संन्यास घेईन", असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस? - Devendra Fadnavis News
- "आम्हीच 'दलाल नंबर टू' चित्रपट काढून तुमचे काळे धंदे समोर आणू", संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल - Sanjay Shirsat on Sanjay Raut