महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेहरू घराण्याचं योगदान कोणीही पुसून टाकू शकत नाही-शरद पवार - Shard Pawar - SHARD PAWAR

Shard Pawar : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसनं मुंबईत सद्भावना दिवस सभेचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Sharad Pawar
शरद पवार (ETV Bharat MH Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 20, 2024, 10:56 PM IST

मुंबई Shard Pawar :माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत सद्भावना दिवस मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यासोबतच केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका :राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शरद पवार यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. "काँग्रेस आणि मुंबई यांचं अनोखं नातं होतं. राजीव गांधी यांचा जन्म मुंबईत झाला. पुण्यातील काँग्रेस पक्षाची पहिली बैठक काही कारणास्तव रद्द होऊन मुंबईत झाली होती. इथंच काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. त्यावेळी महात्मा गांधींनी ऑगस्ट क्रांती मैदानावर स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका घेतली. त्यावेळी चले जावचा नारा देण्यात आला. काँग्रेसची कार्यकारिणी बैठक याच ठिकाणी पार पडली होती. डिस्कव्हरी ऑफ इंडियाचं लेखणंही पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच मातीतून केलं. काँग्रेस तसंच मुंबई यांचं जवळचं नातं आहे. राजीव गांधी यांनी त्यांचं प्रसिद्ध भाषण मुंबईचं दिलं होतं", अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितली.

नेहरू कुटुंबावर सतत टीका :"आपल्या देशाला दिशा देणाऱ्या नागरिकांचा आपल्याला अभिमान असायला हवा. पण ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांना नेहरू कुटुंबाचं नाव घेतल्यावर काय होतं माहीत नाही. त्यांचा पक्ष नेहरू कुटुंबावर कायम टीका करतो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी काहीही म्हटलं तरी नेहरू घराण्याचं योगदान कोणीही पुसून टाकू शकत नाही," असा टोला त्यांनी भाजपाला लगावाला.

आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं :"सुप्रिया सुळे यांच्या लग्नासाठी राजीव गांधी बारामतीत आले होते. त्यानंतर मृत्यूच्या आदल्या दिवशी ते मुंबईत माझ्या घरी थांबले होते. दुसऱ्या दिवशी ते आपल्याला सोडून गेले, हे आपण विसरू शकत नाही. ते देशाचे पंतप्रधान होते. तेव्हा मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं. मी काँग्रेसमध्ये नव्हतो, तेव्हा एक गोष्ट घडली. त्या काळात पंजाबमध्ये अतिरेकी शक्ती वाढत होत्या. तेव्हा राजीव गांधींनी मला बोलावून समस्या सोडवण्याची जबाबदारी सोपवली. त्यासाठी आम्ही तीन दिवस शीख समाजाच्या नेत्यांशी संवाद साधत होतो. त्यानंतर सामंजस्याची भूमिका निर्माण झाली होती," अशी आठवण माजी केंद्रीय संरक्षणमंत्री शरद पवार यांनी सांगितली.

'हे' वाचलंत का :

  1. "शिवसेनेनं राजीव गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली, पण..."उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - sadbhavana diwas 2024
  2. "यांच्याकडे आपण लक्ष देत नाही...", शिंदेंच्या आमदाराला अजित पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर - Ajit Pawar On Mahendra Thorve
  3. "...तर मी राजकारणातून संन्यास घेईन", असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस? - Devendra Fadnavis News

ABOUT THE AUTHOR

...view details