नागपूर Sachin Tendulkar Visit To Tadoba: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि जंगलातील वाघ आणि प्राण्यांच्या कायम प्रेमात असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची पावलं आज पुन्हा ताडोबा जंगलाच्या दिशेनं वळली आहेत. ताडोबा जंगल सफरीला आजपासून सुरुवात झाली आहे. ही संधी साधून सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर जंगल सराफीचा आनंद घेण्यासाठी नागपूरला दाखल झाले. त्यानंतर सचिन तेंडुलकर गाडी चालवत थेट चंद्रपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर उद्या केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी खास नागपुरी पोह्यांवर ताव मारणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सचिन तेंडुलकर गाडी चालवत पोहोचला ताडोबात :आजपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी पुन्हा सुरू होत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी पुन्हा सुरू होत असल्यानं पर्यटकांची पावलं ताडोबाकडं वळली आहेत. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा ताडोबा जंगल सफारीचा खास चाहता आहे. दरवर्षी सचिन तेंडुलकर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सहकुटुंब पोहोचतो. आज ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प विश्रांतीच्या काळानंतर पुन्हा सुरू झाला. ताडोबा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी सचिन तेंडुलकर त्याची पत्नी अंजली तेंडुलकरसह तोडोबात पोहोचला आहे. सचिन तेंडुलकर स्वत: गाडी चालवत विमानतळावरुन ताडोबाकडं निघाला.