अहमदनगरRevenue Minister Vikhe Patil : अहमदनगर दक्षिणमध्ये मागच्या पंचवार्षिक पेक्षा अधिक मताधिक्यानं लोकसभेला सुजय विखे निवडून येईल; कारण हे मतदान सुजयच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विश्वासावरील असल्याचं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी संगमनेरमध्ये म्हटलं.
विखे पाटलांचा टोला :आमदार निलेश लंकेची घरवापसी होत आहे. तेव्हा ते कोणावर नाराज आहे हे अजित पवारांना माहीत असेल. मला माहीत नाही, असं विखे पाटलांनी सांगितलं. लंकेनी खासदारकीचं स्वप्न पाहावं हे 'मुंगेरीलाल के सपने' आहेत, असाही मिश्किल टोला विखे पाटलांनी लगावलाय.
अहमदनगरला होळकरांचं नाव :अहमदनगर शहराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी सातत्यानं होत होती. अहमदनगर जिल्हा ही अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी आहे. त्यामुळे नगर शहराला त्यांचं नाव देऊन उचित सन्मान झाला असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी बोलून दाखविली. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात अहिल्यादेवी होळकरांच्या 298 व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची घोषणा केली होती. त्याची वचनपूर्ती महायुती सरकारनं केली असल्याचं विखे पाटील म्हणाले.